Press "Enter" to skip to content

पोस्ट खाते सुप्त सिंहासारखे

जंजिरा च्या 167 वर्षांची पंरपरा असलेल्या नबाबकालीन टपाल कार्यालयाला मुरुड तालुका सेवा निवृत्त कार्यालयाच्या अध्यक्षांची भेट

सिटी बेल | मुरुड | अमूलकुमार जैन |

मुरुड – जंजिरा येथील सुमारे 167 वर्षांची पंरपरा असलेल्य नबाबकालीन टपाल कार्यालयातील कर्मचारी वृंदास मुरुड तालुका सेवा निवृत्त कार्यालयाचे अध्यक्ष नयन कार्णिक, नैनिता कर्णिक व समन्वयक एम एस जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या . पोस्ट खाते हे सुप्त सिंहासारखे असुन बँका नसलेल्या खेडोपाडी आर्थिक व्यवहार अत्यंत चोखपणे पोस्ट विभाग कार्यरत असुन अतिशय चांगली ग्राहक सेवा देत असल्या बद्दल कर्णिक यांनी गौरवोद्वगार काढले .

या वेळी उप डाक कार्यालय प्रमुख पंकज दांडेकर , सहाय्यक प्रमुख फैय्याज पंचुलकर , दिपक घाटवळ , पोस्टमन विजय शहापूरकर , नंदकिशोर अत्रे , समीर घरत आदी उपस्थित होते .

उप डाक प्रमुख पंकज दांडेकर म्हणाले की,
डाक विभागा कडुन आधार कार्ड सुविधा उपलब्ध करण्यात आली असुन ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो . ज्येष्ठ नागरिकांना सिनियर सिटीजन स्कीम मध्ये 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते .

तसेच 10 वर्षांच्या आतील मुलींसाठी
सुकन्या समृध्दी योजना सुरू आहे . तरी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन डाक कार्यलायामार्फत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.