Press "Enter" to skip to content

महाकर्ज मेळावा संपन्न

अलीबाग तालुक्यातील कुरुळ येथे जिल्हा अग्रणी बँकेतर्फे महा कर्ज मेळावा संपन्न

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

अलिबागमध्ये जिल्हा अग्रणी बँकेतर्फे महा कर्ज मेळावा अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील क्षत्रिय माळी सभागृह, येथे संपन्न झाले. सदर बँक मेळाव्यामध्ये अलिबाग तालुक्यातील नॅशनलाईज बँक यांचे स्टॉल , अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यांचा स्टॉल, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, पोस्ट पेमेंट बँक, स्वयंसहायता समूहाचे स्टॉल, आर सी टी ,रायगड यांचे स्टॉल लावण्यात आले होते.

अलिबाग तालुक्यातील उद्योजक यांनी या कर्ज मेळाव्यासाठी प्रसिद्ध प्रतिसाद दिला यावेळी जिल्हाधिकारी माननीय डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते नऊ उद्योजक यांना मुद्रा कर्ज मंजुरी पत्र त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सीसीसी स्वयं सहायता समूह कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले

जिल्हाधिकारी साहेबांनी उमेद व आर सी टी यांच्या स्टॉलला भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले व व्यवसाय विषयी माहिती घेतली त्याच प्रमाणे स्वयंसहायता समूहाना जास्तीत जास्त कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय वाढीसाठी हातभार लागुन त्यांचा छोटा व्यवसाय मोठा होण्यासाठी सर्व बँकांनी त्यांना पत पुरवठा करून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील असावे असे जिल्हाधिकारी याप्रसंगी म्हणाले

जिल्हाधिकारी माननीय डॉ.महेंद्र कल्याणकर मार्गदर्शन व सूचनेनुसार हा महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास उपविभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया रमण पारकर,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, नाबार्ड चे उप जिल्हा व्यवस्थापक सुधाकर रगतवन, NRLM चे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ यांची जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.