Press "Enter" to skip to content

शेकापने कसली कंबर

उरण नगरपालिका निवडणूक कित शेकाप आपले अस्तित्व दाखविणार : शेखर पाटील शहर चिटणीस

सिटी बेल| उरण | सुनिल ठाकूर |

शेतकरी कामगार पक्षाची आगामी उरण नगरपालिका निवडणूक संदर्भात मीटिंग कोटनाका पक्ष कार्यालयात घेण्यात आली. यावेळी शहर चिटणीस आपल्या भाषणात म्हणाले, उरण नगरपालिका निवणुकीत शेतकरी कामगार पक्ष सज्ज असून आपली ताकद या निवडणुकीत दाखवून देणार आहोत.

उरण नगर पालिकेत प्रभाग पध्दतीने निवडणूक होणार आहे. शेकाप ची ताकद काही प्रभागात आहे तर शेकाप ची काही प्रभागात निर्णायक मते आहेत. यामुळे आम्हाला कोणीही गृहीत धरू नये. येणाऱ्या निवडणूक साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संभाव्य उमेदवार यांनी कामाला लागावे. प्रभागात जनसंपर्क निर्माण करून निवडणुकीसाठी सज्ज राहावे. आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूका लढविणार आहोत. यासाठी शहरातील प्रभागात मीटिंग घेऊन संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी एकजूट होऊन काम करणार आहोत.

यावेळी तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल म्हणाले, लखीमपूर घटनेचा निषेध करून आकरा तारखेच्या महाराष्ट्र बंद ला शेकाप चा पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी शहरातील प्रभाग यांचा आठवा घेतला. शेकाप ची ताकद असलेल्या प्रभागात उमेदवार निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असून उरण नगरपालिका निवडणूक कित शेकाप चे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे प्राधान्य देऊन उरण नगरपालिकेत लाल बावटा फडकविल्यशिवाय रहाणार नाही असे प्रतिपादन केले.

यावेळी नवनिर्वाचित सभापती समिधा निलेश म्हात्रे यांचा सत्कार शहराच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी केला. या मीटिंगसाठी मा उपसभापती महादेव बंडा, मा सभापती नरेश घरत, जेष्ठ नेते काका पाटील, सहचिटनिस यशवंत ठाकूर, युवक अद्यक्ष मयूर सुतार, महिला आघाडी अध्यक्ष सीमा ताई घरत, शहर अध्यक्ष नयना पाटील, सुप्रिया म्हात्रे, प्रियंका म्हात्रे, रेखा घरत, नूतन पाटील, प्रदीप नाखवा, नारायण पाटील, चिंतामण गायकवाड, जितेंद्र ठाकूर, आनंत घरत, राजेश तांडेल, लहू शिंदे आदी कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.