रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांची दिव्यांगाच्या आत्मीयपोटी दिव्यांग कक्षाचे रूपांतर वातानुकूलित कक्षात
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर (छोटमशेठ)यांना दिव्यांगाच्या प्रति असलेली आत्मीयतापोटी रायगड जिल्हयातील दिव्यांग कक्षास स्वतःच्या हक्काची जागा मिळवून देत कक्षसुद्धा वातानुकूलित करून दिला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अंतर्गत असणारे दिव्यांग कक्षामधून दिव्यांग बांधवांना देण्यात येत असलेल्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे.या कक्षाच्या कामगिरीची दखल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी घेत दिव्यांग कक्षास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिव्यांग कक्षाला स्वतःची हक्काची जागा नसल्यामुळे त्यांची अवस्था ही विंचवाचे बिऱ्हाड हे पाठीवर .त्याप्रमाणे दिव्यांग कक्षाची अवस्था झाली होती.
दिव्यांग कक्ष हे पूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील एका छोट्याशा खोलीत होते.त्या खोलीत मध्ये तीन कर्मचारी आणि दोन तीन दिव्यांग बांधव उभे राहू शकतील इतकी छोटी खोली होती. 2015 मध्ये तत्कालीन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष टोकरे यांना रायगड जिल्हा अपंग संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांनी अपंग कक्ष हे ज्या ठिकाणी आहे तेथे जागा अपुरी असल्या कारणाने त्यांना स्वागत कक्षाच्या जागेत स्थलांतर करण्यात यावी अशी मागणी होती.
समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांना दिव्यांग बांधवांना कार्यलायत आल्यानंतर बसण्यासाठी जागा असावी यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा करीत होते. त्यांनतर अपंग कक्ष हे जिल्हा परिषद च्या इमारतीमधून हलवून संघटना सदन येथे हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी सुद्धा दिव्यांग बांधवसाहित कर्मचारी यांना प्रसाधन गृहाची सोय नसल्याने त्यांना तेथून जिल्हा परिषद अथवा समुद्र किनारी असणाऱ्या प्रसाधन गृहात जावे लागत असे.
मात्र दिव्यांग कक्ष हा सर्व सोयीयुक्त असावा अशी धारणा समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांची होती.,कारण संघटना सदनची इमारत ही धोकादायक झाली असून तिचे स्लॅब कोसळले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयालगत असणाऱ्या जिल्हापरिषदेच्या वाहन तळाच्या जागेत दिव्यांग कक्ष उभारण्यात सुरुवात केली. आणि तो कक्ष एक महिन्याच्या आत तयार करण्यात आले.
त्यांनतर समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिथे आद्यवत फर्निचर तयार करून आहे. सदर दिव्यांग कक्ष हा रस्त्यावर असल्याने रस्त्यावरील धूळ उडून त्याचा त्रास कर्मचारी यांना होत आहे.हे लक्षात येताच समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी स्वखर्चाने दीड टनाची वातानुकूलित यंत्रणा बसवून दिली.यावेळी दिव्यांग कक्षात गणेश पूजन करून दिव्यांग कक्षाला स्वतःची हक्काची जागा उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र राज्यात दिव्यांग कक्ष हा वातानुकूलित असलेला कक्ष रायगड जिल्ह्यात एकमेव आहे.








Be First to Comment