Press "Enter" to skip to content

माणगावात बौद्ध धम्म समितीची स्थापना

बौद्ध धम्म समितीच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणार : पंकज तांबे

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

रायगड जिल्ह्यातील माणगावात सामाजिक कार्यकर्ते पंकज रवींद्र तांबे यांनी पुढाकार घेऊन बौद्ध धम्म समितीची स्थापना केली आहे .

या समितीमार्फत आपण विविध सामाजिक , शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले .

यावेळी समितीचे उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के , सरचिटणीस संभाजी गायकवाड , सदस्य सुजित गायकवाड , साहिल गायकवाड यांच्यासह स्वराज्य संघटनेचे चिटणीस रवींद्र मांजरे आदी उपस्थित होते .

सदर समितीच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यावर भर देणार असल्याचे तांबे म्हणाले. या समितीची उर्वरित कार्यकारिणी आपण एका मोठ्या कार्यक्रमामध्ये जाहीर करणार आहोत . ही समिती स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ही समिती रायगडसह महाराष्ट्रात विशेष करून काम करणार आहे .

बहुजन समाजातील गरीब गरजू , सर्वसामान्य समाज बांधवांना शासकीय योजनांची माहिती पुरविणे , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य तसेच , एमपीएससी , यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांना ही समिती प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.