सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थींना वह्या वाटप करण्यात आल्या.
उमरोली ज़िल्हा परिषद वॉर्ड मधील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा डिकसळ, पालीवाडी, बार्डी, उकरूळ, उमरोली, वडवली, आसल,भूतीवली, चिंचवाडी, आसल पाडा, भूतीवली वाडी, आसालवाडी, सागाची वाडी मध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर शेळके यांच्या तर्फे वह्या वाटप करण्यात आल्या.

याप्रसंगी मालू निरगुडा, संदीप पाटील, अमर पाटील, विनायक पाटील, उकरूळ सरपंच वंदना थोरवे, आसल चे सरपंच रमेश लदगे, दिनकर तळपे, आपुराज गायकवाड, रुपेश कोंडे, तेजस भासे, गिरीश भासे, संतोष गायकर, सचिन गायकर, राजेश गायकर,भास्कर लोंगले, योगेश कांबरी, दीपाली कांबरी, राजश्री कांबरी, हरेश्वर कांबरी, विवेक शेंडे उपस्थित होते.
जिते व कुंभे येथील प्राथमिक शाळेमध्ये अक्षय जाधव यांच्या माध्यमातून वह्या, पेन वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे उपस्थित होत्या, तसेच अक्षय हिसाळगे यांनी शेलू येथील प्राथमिक शाळे मध्ये, कळंब येथे शाहनवाज पानसरे यांनी वह्या वाटप केल्या, सोबत शाहिद मस्ते,फाहिक खान, अरुण बदे, रईस डोंगरे, विनोद मोरे, महेश कोंडिलकर,शेहजाद लोगडे, शेलू येथे कु.योगेश मसणे, कु.मनोज शेकटे, कु. विक्रांत कुंभार, कु. तुषार मसणे, कु. प्रसाद मसणे, महेंद्र चौरे,वसंत वाघ, गणेश मंगल मसणे उपस्थित होते.








Be First to Comment