Press "Enter" to skip to content

रसायनीत माजी आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसानिमित्त राजिप शाळांतील विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनी पाताळगंगा परिसरातील रायगड जिल्हा परिषद शाळांत जावून माजी सरपंच संदिप मुंढे यांच्याहस्ते मास्क,सॅनिटायझर तर काही ठिकाणी फळवाटप करण्यात आले.तसेच माजी सरपंच संदिप मुंढे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व सदस्यांनी वृद्धाश्रमात जाऊन फळवाटप करुन माजी आमदार सुरेशभाऊंना दिर्घायुष्य लाभावे असा आशिर्वाद वृध्दांना द्यायला सांगितला.

यावेळी वृध्दांनी देवाकडे तशी प्रार्थना केली.यावेळी रसायनी पाताळगंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी,परीसरातील राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी परिसरातील जिल्हा परिषद शाळांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचेही वाटप केले.

यावेळी शिवनगरवाडी शाळेत वाटपप्रसंगी कार्यक्रमात माजी सरपंच संदिप मुंढे म्हणाले की, कर्जंत विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले सुरेशभाऊ लाड यांनी आपल्या राजकीय जीवनात कायम विकास प्रक्रियेला प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या आमदार निधीतून आणि शासनाच्या विविध योजनांमधून कर्जंत आणि खालापूर तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे,हे सर्व मान्य करतील.भाऊंसारख्या विकासपुरुषाला रसायनी पाताळगंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शुभेच्छा देताना माजी सरपंच संदिप मुंढे म्हणाले.

यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रेय शिंदे,राष्ट्रवादी रसायनी विभाग अध्यक्ष अनिल पिंगळे,मोहोपाडा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रेश्मा भगत,माजी सदस्य नामदेव कोकंबे, संतोष मांडे, पांडुरंग पारंगे, कैलास म्हात्रे, नंदकुमार कुरंगले, संतोष पाटील, देवेंद्र शिंदे, जयराम पाटील, जयेश वासणिक,रोशन म्हात्रे,मधू रसाल, संदिप पाटील, नितिन पाटील, योगेश म्हात्रे,केदार शिंदे,कल्पेश शहा विनायक गायकवाड,नयन म्हात्रे,राजू नायक,बाबू वाघमारे आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.