सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील चावणे येथील कोकुयो कॅमलीन कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सवणे व चावणे परिसरापासून काही अंतरावर असलेल्या दुर्गंम भागातील पाच राजिप शाळांतील गरीब व गरजू अशा 95 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, भेटवस्तू व खाऊचे वाटप कोकुयो कंपनीचे कंपनी मॅनेजर दिपक कापसे,एच आर प्रमुख गणेश आहेर,अॅडमिन प्रमुख सतिष कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राजिप शाळांतील उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार देवून सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कॅमलीन कंपनीचे उत्पादन साहित्य शालेय वस्तूंचे असल्याने 95 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (पेन, पेन्सिल,मार्कर,गम,खडू,स्केचपेन) आदी वस्तू कंपनी कशी उत्पादित करते,यावर मार्गदर्शन करुन कंपनी परिसर दाखविण्यात आला.आपण शाळेत वापरत असणा-या वस्तू कशा तयार होतात ,हे प्रत्यक्षात पाहून त्याची माहिती विद्यार्थ्यांना झाली.यानंतर सर्वं विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य संच, भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी कोकुयो कंपनीचे कंपनी मॅनेजर दिपक कापसे म्हणाले की,दिड वर्षांच्या लाॅकडाऊनमुळे शाळा आणि विद्यार्थी यात दुरावा निर्माण झाला आहे.तो दूर करण्यासाठी कोकुयो कॅमलीन कंपनीने शनिवार दि.9 रोजी सदर उपक्रम आयोजितल्याचे सांगितले.कंपनीव्दारे बालविकास व शैक्षणिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीकोनातून हातभार लावला जातो.तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, महिला सशक्तीकरण,बालविकास व आरोग्य, सांस्कृतिक उपक्रम आदींवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान कॅमलीन कोकुयो कंपनीकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मोफत शालेय साहित्य, आकर्षंक भेटवस्तू मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.यावेळी कोकुयो कंपनीचे कंपनी मॅनेजर दिपक कापसे,एच आर हेड गणेश आहेर, अॅडमिन हेड सतिश कळमकर , कॅन्टीन चालक यादव अण्णा सुवर्णा आदींसह शालेय मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment