Press "Enter" to skip to content

उघडे गटार नागरिकांसाठी डोकेदुखी

अलीबाग पोस्ट कार्यालयलगतचा रस्ता खचून तेथील गटार पडले उघडे

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

अलिबाग शहरातील पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. यामध्ये महिला व जेष्ठ नागरिक यांचा समावेश जास्त असतो. अशातच येथील रस्ता खचून गटार उघडे पडले आहे. तेव्हा वाहन किंवा पादचारी यात पडून मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

अलिबाग शहरातील जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय जवळ असलेल्या जिल्ह्याच्या पोस्ट कार्यालयलगतचा रस्ता खचून तेथील गटार उघडे पडले आहे. येथून बाजूला पोस्टाचे एटीएम आहे. पोस्ट कार्यालयाला दोन द्वार असले तरी एटीएमच्या बाजूच्या द्वाराजवळ खचलेल्या व उघड्या गटार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिसरात एकच एटीएम असल्याने नागरिक येथे येत असतात. तर पोस्टाच्या कामासाठी देखील जेष्ठनागरिक व महिला यांचा येथे वावर असतो. उघड्या गटाराने पसरलेली दुर्गंधी, त्यात एखादे वाहन अथवा पादचारी पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेने याकडे लक्ष देऊन हे उघडे गटार बंद करावे व खचलेला रस्ता नीट करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.