Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद सर्वसाधारण सभा संपन्न

कर्जत – भिसेगाव भुयारी मार्गास अनंत काका जोशी यांचे नाव

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली, अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली तर कर्जत-भिसेगाव भुयारी मार्गास स्वर्गीय अनंत काका जोशी मार्ग असे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती ह्या सभेस नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, भारती पालकर,सुवर्णा निलधे, विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, बळवंत घुमरे, संचिता पाटील, पुष्पा दगडे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळिंबकर, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, उमेश गायकवाड, शरद लाड, वैशाली मोरे, नितीन सावंत, संकेत भासे, हेमंत ठाणगे आणि मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस नगरसेवक बळवंत घुमरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले, त्या बद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यानंतर नगरपरिषदेस एम एम आर डी ए च्या माध्यमातून निधी प्रस्तावित झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवक विवेक दांडेकर यांनी मांडला त्यास सर्वांनी अनुमोदन दिले, त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने विषय पत्रिकेवर असलेल्या 15 विषयांच्या कामकाज सभेस सुरुवात झाली.

विषय पत्रिकेवर असलेल्या विकास कामांना सभेत मंजुरी देण्यात आली तर विषय पत्रिकेवर असलेल्या 12 नंबरच्या विषयावर नगरसेवक विवेक दांडेकर यांनी दिलेल्या पत्रात कर्जत- भिसेगाव भुयारी मार्गास स्वर्गीय अनंत काका जोशी भुयारी मार्ग असे नाव देण्याचा विषय चर्चेला आला त्याच सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
——————
यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील नियोजित कामास थोर व्यक्तीचे नावे देण्यास ठराव सर्वानुमते मंजूर झाले आहेत.

# कर्जत नगरपरिषद हद्दीतील आमराई येथील नाट्यगृहास राम गणेश गडकरी यांचे नाव देण्याचा ठराव

# मुंबई, पुणे कडून कर्जत नगरपरिषद हद्दीत प्रवेश करताना मौजे मुद्रे येथे उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वारास महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा ठराव

# शहापूर-मुरबाड, कडाव कडून कर्जत कडे येणाऱ्या ठिकाणच्या प्रवेशद्वारास महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव

# तमनाथ कडून कर्जत कडे येणाऱ्या ठिकाणच्या तिस-या प्रवेशद्वारास भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव

# कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये नदी संवर्धन प्रकल्पास हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव

# कर्जत नगरपरिषदेचे आमराई येथील क्रिडांगणास स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रिडा संकुलन असे नाव देण्याचा ठराव
हे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.