Press "Enter" to skip to content

गाड्या भाड्यावर घेऊन त्यांची परस्पर विक्री करणारा ठग गजाआड

खांदेश्वर पोलीस ठाण्याचे उत्कृष्ट अन्वेषण : आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी केले अभिनंदन

सिटी बेल | पनवेल |

खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे गाड्या भाड्यावर घेऊन त्यांची परस्पर विक्री करणारा ठग गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पनवेल येथे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचे बाबत माध्यमांना अवगत केले.
       

तक्रारदार प्रफुल्ल दिपक वाझे यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या टीम ने तपास सुरू केला.आरोपी हा गाड्या भाड्याने लावतो असे सांगून गलेलठ्ठ भाडे देत असे. सुरुवातीचे दोन ते तीन महिने तो भाडे नित्य नेमाने द्यायचा.त्या नंतर भाडे थकवून तो परागंदा होत असे.कालांतराने त्या गाड्यांची तो विक्री करायचा किंवा त्यांची विल्हे वाट लावायचा असे तपासात निष्पन्न झाले.
       

पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग,पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील,सहा.पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास करून खारघर येथून आरोपी संदीप राघो शेट्टी यास शिताफीने अटक करण्यात आली.या प्रकरणातील ९ वाहने पोलिसांच्या ताब्यात असून बाकी दोन वाहनांचा छडा लागला असून लवकरच ती पोलिसांच्या ताब्यात येतील.आरोपीविरुद्ध  भा दं वि ४२०/४०६ कलमांचे खाली  गु र नं २०९/२०२१ दाखल झाला आहे.
        

पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले तसेच जनतेस आवाहन केले की,अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.आपल्या गाड्या भाड्याने देताना समोरच्या व्यक्तीची अथवा कंपनी ची खात्री करावी.तसेच जी पी एस ट्रेकर चे माध्यमातून आपल्या वाहनांची लोकेशन तपासात राहावे.
       

या तपासात पोलीस निरीक्षक गुन्हे डी डी ढाकणे,स पो नि प्रविण पांडे, पो उप नि निलेश पोळ,पो उप नि अमोल खाडे, पो हवा महेश कांबळे,पो हवा सुदर्शन सारंग,पो हवा यादव,पो ना चेतन घोरपडे,सचिन सरगर, अमित पाटील,विशाल घोसाळकर,नवनाथ लवटे, पो शि चेतेश वळवी, पो शि संभाजी गाढे,पो शि प्रविण पाटील, यांनी उत्तम कामगिरी बजावली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.