Press "Enter" to skip to content

ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे आरोग्य समस्यांमध्ये झाली वाढ

शाळा सुरु झाल्यामुळे नागरिकांना सतावत आहे कोरोनाची चिंता

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरीही तिसऱ्या लाटेविषयी वैद्यकीय क्षेत्रातूनच नाही तर जगभरातून अनेक भाकिते वर्तवली जात आहेत . कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असाही दावा केला जात आहे परंतु याआधी आपल्याला ऑक्टोबरमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे.

मुंबईतील तापमानाचा पारा वर चढत असून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होत आहेत. लोक काम धंद्यानिमित्त बाहेर असोत की, की घरात पंख्याखाली असोत, वाढत्या उकाड्यामुळे त्यांचा जीव कासावीस होत आहे. त्यामुळे ‘नको हा उन्हाळा बरा होता पावसाळा ” असे म्हणण्याची पाळी आली आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात तापलेली मुंबई आणि त्यानंतर आलेल्या पावसाच्या सरी या वातावरणामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे.

महानगरपालिकेच्या रुग्णालयात ताप, डेंग्यू, मलेरिया तसेच पोटदुखीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या आधीच्या पंधरवडय़ापेक्षा अधिक आहे. त्यातच डेंग्यूची साथ कमी होत नसून या महिन्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. शाळा सुरु झाल्यामुळे अनेक नागरिकाना आपल्या मुलांना कोरोना तर होणार नाही ना याची चिंता वाटत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ म्हणाले, ” ऑक्टोबरमध्ये पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असला तरीही ऑक्टोबर हिटचा सामना आपल्या सर्वाना करावा लागत आहे. ऑक्टोबर हा रोगराई पसरण्याचा महिना मानला जातो कारण पाऊस कमी झालेला असतो व थंडीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. आकाशातुन सूर्याची किरणे सरळ धरतीवर येतात, आकाशात ढग नसल्यामुळे हि किरणे जी उष्णता वाढवतात त्यालाच ऑक्टोबर हिट असे म्हटले जाते.

मुंबई व जवळच्या शहरांमध्ये हा महिना उष्णतेच्या बाबतीत अगदी त्रासदायक समजला जातो जेष्ठ नागरिकांना व लहान मुलांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागतो. जेष्ठ नागरिक व लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे त्याना चक्कर येणे, लघवीचा त्रास तसेच अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ शक्तात तसेच फिरतीची कामे करणाऱ्या नागरिकाना या वाढत्या उकाडय़ामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, डिहायड्रेशन, चक्कर येणे, पायाच्या तळव्यांची आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे, उलटी असे त्रास होऊ शक्तात.

आपण सध्या कोरोनाच्या महामारीचा सामना करून बाहेर आलो आहोत अशावेळी ऑक्टोबर हिटचा सामना आपणास करावयाचा आहे कारण तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही आहे. या काळात शक्यतो उन्हामध्ये काम करणे टाळावे, तेलकट – तिखट कमी खावे, पाणी भरपूर पिणे तसेच श्रमदायक काम करीत असताना स्वच्छता पाळणे गरजेचे आहे,कारण संसर्गजन्य आजार सुद्धा या काळात वाढू शकतात “

मुळातच गेली काही वर्षे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. या जागतिक तापमानवाढीमुळे जगातील बर्फाचे साठे वितळण्यापासून तो ऋतू बदलण्यापर्यंत व त्याचा फटका शेतीला बसण्यापर्यंत अनेक अनर्थ घडत आहेत. वातावरणातील कार्बन वाढल्याने पृथ्वीच्या तापमानात झपाटयाने वाढ होत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे ऋतूबदल, बर्फ वितळणे, नद्यांना पूर येणे, वादळे व चक्रीवादळे यांचे प्रमाण वाढणे, भारतासारख्या देशात अतिवृष्टी होणे व पर्जन्यमान अनियमित होणे, अशी संकटे येत आहेत अशी माहिती डॉ. प्रवीण भुजबळ यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.