Press "Enter" to skip to content

रूग्णालय लागले मरणपंथाला : स्लॅब कोसळून दोन जखमी

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील स्त्री कक्षातील स्लॅब सहित पी ओ पी कोसळला

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्हयातील अलिबाग येथील सामान्य रुग्णांलयातील स्त्री कक्षातील स्लॅब सहित पी ओ पी कोसळला.दोन महिला जखमी असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्त्री मेडिकल कक्षातील स्लॅब पी ओ पी सिलिंगवर पडल्याने पी ओ पी सिलिंग खाली असलेल्या दोन महिला यांच्या अंगावर पडला असून त्या जखमी झाले असल्याची चर्चा तेथील काही रुग्णामध्ये आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोसळल्या स्लॅब बाबत जिल्हा रुग्णालयातील कोणीही अधिकारी कर्मचारी बोलण्यास तयार नाही.मात्र आमचे प्रतिनिधी यांनी तेथील काही रुग्णांनी स्लॅब कोसळून दोन महिला जखमी झाला असून त्यांना सुदैवाने मोठ्या प्रमाणात दुखापत झाली नाही आहे.

त्याचप्रमाणे येथील महिला अधिकारी कर्मचारी यांनी रुग्ण सहित नातेवाईक याना ताकीद दिल्यामुळे कोणीही उघडपणे बोलण्यास तयार होत नाही. महिला मेडिकल कक्षामध्ये स्लॅब सिलिंगवर पडून पूर्ण सिलिंग महिला वॉर्ड मध्ये कोसळली .दोन गरीब रुग्णांच्या थोडंफार लागलं पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही .आज प्रत्येक महिन्याला सामान्य रुग्णालयात स्लॅब कोसळत आहे पण याची कोणीही दखल सामान्य रुग्णालयात अधिकारी व प्रशासन घेत नाही .

सरकारी निधी फक्त ठेकेदार फक्त खिसे भरण्यासाठी आहे का ? आज प्रत्येक महिन्याला स्लॅब पडतोय पण अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडत नाही का ? भविष्यात जर स्लॅब पडून कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण ? सरकार कडून आलेला कोट्यावधी निधी याचा उपयोग कुठे केला जातो याचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी समाजवादी पक्षाच्या अलिबाग विधानसभा महिला अध्यक्षा सारिका माळी शिंदे यांनी केली आहे.

या दुर्घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याशी संपर्क साधला असता ते आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या दुरदृश्य प्रणाली बैठकीत असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.