सिटी बेल लाइव्ह /उरण (वार्ताहर): उरण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती
ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती
पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे धुतुम येथील दिलीप धावजी ठाकूर यांचे घर, मु.धुतुम, ता.उरण (पूर्वेस
राम गोकुळ ठाकूर यांचे घर, पश्चिमेस-चांगू राजाराम घरत यांचे घर,
दक्षिणेस-मोकळी जागा व उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर
मौजे बोकडविरा येथील मु.रुम नं.103, चिंतामण सोसायटी, सिडको कॉलनी,
बोकडविरा, ता.उरण (पूर्वेस-अंतर्गत रस्ता, पश्चिमेस-अंतर्गत रस्ता,
दक्षिणेस-सिडको लॉटरी बिल्डिंग व उत्तरेस-रो हाऊस प्लॉट नं.19, 20, 21)
हा परिसर
मौजे चाणजे येथील किरण नारायण पाटील यांचे घर मु.चाणजे, ता.उरण
(पूर्वेस-राजेश शिंदे यांचे घर, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मोकळी
जागा व उत्तरेस-तुळशीराम श्रावण कडू यांचे घर) हा परिसर.
मौजे रांजणपाडा येथील हरिश्चंद्र आत्माराम पाटील यांचे घर, मु.रांजणपाडा,
ता.उरण (पूर्वेस-सुंदर पाटील यांचे घर, पश्चिमेस-मोहन नामा पाटील यांचे
घर, दक्षिणेस-विलास कृष्णा पाटील यांचे घर व उत्तरेस-मोकळी जागा) हा
परिसर
मौजे नवघर येथील नरहरी महादेव कडू यांचे घर, मु.नवघर, ता.उरण
(पूर्वेस-बिल्डिंग नं.78, पश्चिमेस-अंतर्गत रस्ता, दक्षिणेस-बिल्डिंग
नं.80 व उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर
मौजे नवघर येथील हिमांशू नथुराम बंडा यांचे घर, मु.नवघर, ता.उरण
(पूर्वेस-कृष्णा जनार्दन बंडा यांचे घर, पश्चिमेस-गणेश काशिनाथ बंडा
यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा व उत्तरेस-योगेश गोपाळ बंडा यांचे घर) हा
परिसर
मौजे चिरनेर येथील मनोज गणपत खारपाटील यांचे घर, मु.चिरनेर, ता.उरण
(पूर्वेस-नेरश रामा मोकल, पश्चिमेस-कैलास दामोदर खारपाटील,
दक्षिणेस-धनाजी रामभाऊ खारपाटील यांचे घर व उत्तरेस-काशिनाथ दामोदर
खारपाटील यांचे घर) हा परिसर
मौजे द्रोणागिरी नोड येथील मु.राजद्वारका बिल्डिंग, प्लॉट नं.27-28,
द्रोणागिरी नोड, ता.उरण हा परिसर
मौजे केगाव येथील पूर्वेस-नाला व मोकळी जागा, पश्चिमेस-रवि रामदास कोळी
यांचे घर, दक्षिणेस-सांगर मंडळ यांचे घर व उत्तरेस-शांताराम पांडूरंग
गावंड यांचे घर हा परिसर
मौजे पागोटे येथील आदर्श प्रमोद तांडेल यांचे घर मु.पागोटे, ता.उरण
(पूर्वेस-भगवान सदानंद तांडेल यांचे घर, पश्चिमेस-मोकळी जागा,
दक्षिणेस-भालचंद्र केशव तांडेल यांचे घर व उत्तरेस-किरण वासूदेव पाटील
यांचे घर) हा परिसर
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस
Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली
आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य
ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित
क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी श्री.दत्तू
नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व
तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड
संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले
आहे.
Be First to Comment