सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत आंदोलन केले. तालुक्यातील खराब रस्त्यांची छायाचित्र प्रदर्शन मांडून तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषद बांधकाम खाते यांना या आंदोलनाच्या निमित्ताने जाब विचारला.
कर्जत तालुक्यातील नेरळ – ममदापुर – भडवळ, नेरळ – कळंब, नेरळ – कशेळे, कळंब – पाषाणे, कर्जत – कोंदिवडे, नेरळ पेशवाई रोड आणि चिंचवली। – कडाव या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज 6 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील रस्त्यांची स्थिती दाखविणारे छायाचित्र प्रदर्शन कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात लावण्यात आले.त्यावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, भाजप किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे, भाजप कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, भाजप कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, कर्जत नगरपरिषद उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप नेरळ जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष संदीप म्हसकर आदी उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचे चित्र प्रदर्शनाचे उदघाटन केल्यानंतर जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी कर्जत तालुक्यातील खराब रस्त्यांना हे राज्य सरकार अवलंबून असून सर्व रस्ते खड्डेमय झाल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या शरीराचा खुळखुळा झाला आहे. पाठीच्या आजारांनी वाहनचालक त्रस्त झाले असून शासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे. असे यावेळी जाहीर केले.शासनाने बांधकाम विभागांना आदेश देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून अनेक ठिकाणी आंदोलने करू असे जाहीर केले.








Be First to Comment