Press "Enter" to skip to content

महिलांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने व स्वयंरोजगार उपलब्धीसाठी प्रामुख्याने दारिद्र रेषेखालील, निरक्षर ,नवसाक्षर, अकुशल, कामगार आणि अनुसूचित जाती मागासवर्गीय अशा समाजातील सर्व स्तरातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने रोहे तालुक्यातील देवकान्हे येथे महिलांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.

श्री मनुष्यबळ विकास मंत्रा. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट रोहा रायगड (एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड यांची सेवाभावी संस्था) व जन शिक्षण संस्थान रायगड (पूर्वाश्रमीचे श्रमिक विद्यापीठ-लय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने देवकान्हे गावातील महिलांसाठी व धानकान्हे आदिवासी वाडीतील महिलांसाठी या कार्यक्रमातंर्गत २ महिन्याचा पूर्णवेळ शिवणक्लास सुरु कारण्यात आला.

एकूण दोन्ही क्लास साठी ४४ महिलांनी आपली नावे नोंदवली आहेत. या कार्यक्रमाला सरपंच वसंत भोईर,, उपसरपंच सुरज कचरे,सदस्य दयाराम भोईर,ज्ञानेश्वर वाघमारे,पुजा गोसावी, निलीमा भोईर,रिया भोईर पार्वती वाघमारे तसेच जन शिक्षण संस्थेकडून कार्यक्रम प्रमुख सुकन्या मॅडम, प्रशिक्षक शामल मॅडम आणि एक्सेल कंपनीचे सुशिल रुळेकर, सीएसआर मॅनेजर व व्हिआरटीआयचे प्रमुख रोहा, वि.आर. टी. आय. कडून रिटा कशवालीया प्रोजेक्ट लीडर उपस्थितीत होते. सदर उपक्रमासाठी वि. आर.टि.आय संस्थेचे ट्रस्टी गोसालिया , आदित्य कुमार निगम प्रेसिडेंट, मंचेकर साहेब एच.आर.प्रमुख नितीन जोशी पी.आर.ओ. यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मनुष्यबळ विकास मंत्रा. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट रोहा रायगड (एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड यांची सेवाभावी संस्था) व जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या वतीने
महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल सरपंच वसंत भोईर यांनी विशेष शब्दात आभार व्यक्त केले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.