Press "Enter" to skip to content

माध्यमिक शाळांना भेडसावत असणारे प्रश्न तातडीने सोडविण्याची राज्यशिक्षक सेनेची मागणी

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज मो अभ्यंकर यांच्या आदेशान्वये, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी ज्योती शिंदे, पे युनिट अधीक्षक कार्यालय, लेखाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटी देऊन शाळांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.

रायगड जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे म्हणून निवासी जिल्हाधिकारी यांना भेट देऊन निवेदन दिले तसेच तातडीने पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून झालीच पाहिजेत अशी मागणी केली. पगार राष्ट्रीयीकृत बँकातूनच होतात या अशीही माहिती निवासी जिल्हाधिकारी मॅडम यांनी मान्य केले. सहकार्य करण्याचे आश्वासित केले, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले .वरिष्ठ वेतनश्रेणी निवडश्रेणी यादी त्वरित जाहीर करणे – १५ दिवसांत याद्या जाहीर होतील असे त्यांनी सांगितले .

अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, वीना अनुदानावरून अनुदानावर बदली , सेवानिवृत्त लोकांच्या पेन्शन केस व फायनल पेमेंट बिलावर सह्या करणे , आरटीई पुनर्मान्यता, मुख्याध्यापकांना मार्गदर्शनपर सभा लावणे,कार्यालयात आलेल्या मुख्याध्यापक- शिक्षकांना सन्मानाने वर्तणूक देणे ,शैक्षणिक कामांकरिता सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यास एकदाच त्रुटी काढून शाळेस कळवणे , वारंवार त्रुटी काढू नयेत, अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ प्रणालीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी कार्यालयात आलेल्या फाइल शिफारशीसह उपसंचालक कार्यालयात त्वरित पाठविणे, रोस्टर तपासणी त्वरित करून मिळावी, विनाअनुदानित शाळांचे मूल्यांकन कराचे प्रस्ताव प्रलंबित असल्यास शिफारशींसह शासनास पाठवाव, प्रलंबित संचमान्यता दुरुस्त करून मिळाव्यात.अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पे युनिट कार्यालयालाही भेट देऊन जुनी पेंशन योजना कर्मचा-यांची माहीती शासनास तात्काळ पाठवण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचार्यांचे फायनल पेमेंट त्वरित मिळावे , पीएफ ना परतावा मिळावा,पीएफच्या स्मिता मिळविण्यासाठी कॅम्प लावावा – लवकरच कॅम्प लागणार असून सर्वांना स्लिपा मिळतील.
त्यासाठी विशेष लिंक तयार करून माहिती मागवली जाणार आहे,सातवा वेतन आयोगचे हप्ते मिळावेत, दरमहा पगार बिले वेळेत अॅप्रू करावीत, काही वैयक्तिक शाळांचे प्रश्न होते तेही तातडीने मार्गी लावले.

तसेच लेखाधिकारी यांच्याकडील वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना स्टॅम्पिंग करून मिळणे, ऑडिट तपासण्याकरता शाळांच्या मागणीनुसार कॅम्प लावणे अन्य वैयक्तिक विषयांवर चर्चा करून तातडीने सोडण्यात आले.

सोबत मुख्याध्यापक संघ मुंबई विभागाचे सचिव लखीचंद ठाकरे , रायगड जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष रवींद्रनाथ पाटील ,उर्दू शिक्षक सेनेचे समन्वयक फरिदुल काझी, जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष गजानन म्हात्रे, माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पारकर , उपाध्यक्ष पवार , सचिव कुशिरे सर , श्री कांबळेसर ,पेण तालुका अध्यक्ष सुरेश मोकल, माणगाव शिक्षक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत अधिकारी, रोहा तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, राजन पाटील,प्रकाश भोईर,अरुण पाटोळे व अन्य शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.