पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित : रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ करणार आंदोलन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
जवाहरलाल नेहरू बदंर प्रकल्प विस्थापित शेवाकोळीवाडा गावातील सन १९८४ सालच्या शासन निर्णयाने शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी ८६ व बिगर शेतकरी १७० अशा एकूण २५६ कुटुंबांचे गेली ३५ वर्षे पुनर्वसन झाले नाही.या गावातील सर्व घरांना वाळवी लागली आहे. त्यामुळे घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
गावातील बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन नाही. विविध सेवा सुविधापासून वंचित ठेवल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची फसवणूक झाली होती . त्यामुळे कायदेशीर पुनर्वसन फसवणुकीच्या निषेधार्थ हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी दिनांक २६/०२/२०२१ रोजी जे.एन.पी.टी चॅनल बदं आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्या बाबत पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून दिनांक १५/०१/२०२१ रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना अहवाल सादर केला होता.
त्याबरोबर जिल्हाधिकारी रायगड यांनी दि.१८/०१/२०२१ रोजी बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी रायगड यांनी दि.०५/०२/२०२१ व ११/०२/२०२१ रोजीचे पत्राने दि.१७/०३/२००६ रोजीची पूनर्वसनासाठी अपूर्ण असलेली ५ कोटी ६९ लक्ष रक्कम ताब्यात घेतली आहे. आणि दि.२२/०२/२०२१ रोजी बोरीपाखाडी येथील १७ हेक्टर जमीन हनुमान कोळीवाडा गाव वहिवाटीस नकाशा व १ ते १० सर्वे नं देऊन आकारबंद व गाव नमुना नं.७/१२ वर चढवली आहे. CZMP सन २०१७-१८ च्या नकाशा मध्ये त्या जमिनीवर कादंळवन आहे. जिल्हाधिकारी रायगड यांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर पूनर्वसन आजतागायत केलेले नाही.त्या निषेधार्थ दि. ०३/१०/२०२१ रोजी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची मंदिरात बैठक संपन्न झाली.या बैठकीत दिनांक ०१/१२/२०२१ रोजी आंदोलन करण्याचा हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेतला आहे.








Be First to Comment