सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मुथुट फिनकॉर्पंतर्फे खोपोली नगरपरिषद मधील स्वच्छता दुतांचा तसेच कोरोना योद्धांचा सत्कार सोहळा बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी मुथूट फिनकॉर्प खोपोली शाखेमध्ये संपन्न झाला.
कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता खोपोली नगरपरिषदेचे स्वच्छता दुत काम करीत होते त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून मुथुट फिन्कॉर्पचे पदाधिकारी
चैत्रराज नायर, ब्रांच मॅनेजर प्रियांका वाणी असिस्टंट ब्रांच मॅनेजर गणेश तोरणे, आकांक्षा देवकर,सीमा चव्हाण आणि नम्रता विचारे यांच्याहस्ते कोरोनायोध्दा दिलीप मोरे,मंगेश गायकवाड,सीताराम पवार,योगेश यादव,अविनाश ठाकरे,संतोष यादव,बाबू मोरे,विलास गायकवाड संदीप फाळे,विठोबा म्हात्रे,विजय वाघमारे,नितीन ढोले,निलेश गायकवाड,आनंद शिंदे,आणि मयूर साळुंके यांचा प्रशस्ती पत्रक , पुष्गुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सामान्य जनतेला निरोगी ठेवण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे.तुमच्या कामाचे मोजमाप कुणीही करू शकत नाही असे मुथुटमध्ये काम करणाऱ्या स्टाफचे म्हणने आहे.
मुथुट फिनकॉर्प ही सोने तारणावर कर्ज देणारी बँक आहे. सर्वसामान्यांना परवडणारी त्वरित व कमी व्याज दरामध्ये कर्ज देणारी तसेच या शाखेमध्ये विविध प्रकारचे विमा देखील उपलब्ध आहेत.








Be First to Comment