सिटी बेल | रसायनी | प्रतिनिधी |
हिदु़स्थान बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रायगड रसायनी येथील पत्रकार राकेश काशिनाथ खराडे यांच्या पत्रकारीतेची नोंद करण्यात आली असून त्यांना हिंदूस्थान बुक ऑफ अवार्ड सन 2021 च्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रभुषण पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
पत्रकार राकेश खराडे यांनी गेल्या वीसपेक्षा जास्त काळ पत्रकारिता क्षेत्रात घालविला. त्यांनी विविध दैनिक वर्तंमानपत्रांत काम करीत असताना आपल्या लेखनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लेखणी केली.आजही करत आहेत.त्यांच्या लेखणीची हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून त्यांना सन 2021 चा हिंदुस्थान बुक ऑफ अवार्डंने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रभुषण पुरस्काराने केद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सिनेअभिनेत्री मयुरी शुभानंद,सिने डायरेक्टर प्रसाद ताटकर यांच्या सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.पत्रकार राकेश खराडे यांनी आपल्या पत्रकारीतेचा वीस वर्षे काळात जवळपास दहा हजारांहून अधिक नागरिकांच्या समस्या मांडणा-या बातम्या विविध दैनिक वर्तंमानपत्रांत मांडून पाठपुरावा केला.त्यांच्या या कार्यांची दखल घेऊन त्यांना फेब्रुवारी 2021 रोजी सदर पुरस्कार जाहीर झाला होता.परंतु कोरोना संसर्गं असताना त्यांना हिंदुस्थान बुक ऑफ अॅवार्डंतर्फे महाराष्ट्राचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रभुषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी देशभरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.पत्रकार राकेश खराडे यांच्या पत्रकारीतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन त्यांना सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment