Press "Enter" to skip to content

लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा च्या वतीने मुठवली येथे शैक्षणिक साहित्य वाटप

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा व लायन माधव आग्री यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जय भवानी मित्र मंडळ ग्रामस्थ व महिला मंडळ मुठवली खुर्द यांच्या सहकार्यातून रोहा तालुक्यातील मुठवली खुर्द येथे या परिसरातील इयत्ता दहावी, बारावी, व पदविधर या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले आयोजित उपक्रमाला विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा चे अध्यक्ष डॉ सागर सानप ,रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक अभिजित ठाकरे रोहा लायन्सक्लबचे पी आर ओ पराग फुकणे, लायन्सक्लबचे खजिनदार डॉ श्याम लोखंडे,सचिव रवींद्र लोखंडे,उपाध्यक्ष माधव आग्री,बोर्ड ऑफ डायरेक्टर गजानन बामणे,लायन अनिल महाडिक अलंकार खांडेकर, नंदकुमार कळमकर,राजेंदर कोप्पू, महेश तुपकर,विश्वास निकम , ग्रामपंचायत उपसरपंच योगेश शिंदे, गावचे अध्यक्ष सतीश ठाकूर,ग्राम पं सदस्य मारुती तुपकर ,चंद्रकांत शेळके,नरेश गायकर, येणाजी शिंदे,श्याम सावंत, पोलीस पाटील राम सावंत, यांच्यासह मान्यवर उपस्थित तसेच आदी विद्यार्थी व ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी या परिसरातील सुमारे तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वरूपातील वस्तूंचे वाटप केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर अभिजित ठाकरे,लायन्सक्लब चे अध्यक्ष डॉ सागर सानप,लायन माधव आग्री ,पराग फुकणे,डॉ श्याम लोखंडे,रवींद्र लोखंडे,उपसरपंच योगेश शिंदे,पोलीस पाटील राम सावंत, यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन राष्ट्रगीताने तसेच महाड येथील तलीय दरदग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली तद्नंतर मान्यवरांचे स्वागत विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रास्तविक डॉ श्याम लोखंडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपस्थित विद्यार्थी वर्गाच्या वतीने कु दिव्या बामणे हिने मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.