Press "Enter" to skip to content

जुन्या पुतळ्याच्या वर्ष झाली तीस,मग मी का करु ऊद्धाटनाचा कार्यक्रम मिस : आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते खोपोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

सिटी बेल | खालापूर | विकी भालेराव |

जुन्या पुतळ्याच्या वर्ष झाली तीस, मग मी का करु ऊद्धाटनाचा कार्यक्रम मिस ! अशा काव्यपंक्ती च्या उच्चारात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हसत हसत चिमटे काढले. आज ते नगर परिषद खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरण करण्यासाठी आले होते.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होता कामा नये. आपल्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे मात्र दुरावा निर्माण नको. मोदींच्या नेतृत्वाखालील मी एकटा गेलो मी मंत्री झालो, आंबेडकरी बाकी नेते मागे राहिले. असे सांगत आठवले पुढे म्हणाले की, खोपोली ची माणसं मला आवडतात. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह या कार्यक्रमाला खोपोली मधून बसेस भरून आलेले खोपोलीकर आहेत.

ते पुढे म्हणाले की, मी लोकसभा सभागृहात हसवता, हसवता कुणाला फसवतो हे त्यांना ही कळत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी भिम शक्ती शिव शक्ती एकत्र करण्याचे स्वप्न पाहिले होते त्याचा मी खरा साक्षीदार आहे. प्रबोधनकार ठाकरे व बाबासाहेब आंबेडकर मित्र होते. आपण ही मित्र असले पाहिजे असं मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांना उद्देशून केले.सध्या सामाजिक सुधारणा झाली आहे.
बाबासाहेबांचा पुतळा फारच आहे सुंदर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सुशोभीकरण या ठिकाणी झालेला आहे याचा मला अभिमान आहे.

खासदार बारणे म्हणाले की, संविधानाच्या पलीकडे जाऊन कोणालाही काम करता येत नाही. देशाच्या हितासाठी या देशाच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.तर मागासवर्ग समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि समाजाला दिशा दाखवण्याचं काम सामाजिक न्यायमंत्र्यांच्या माध्यमातून आठवले करीत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले उल्लेखनीय कार्य कित्येक वर्षानंतर आज सुद्धा पिढ्यानपिढ्या केले जाते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य फक्त या देशात मर्यादित नव्हे तर संपूर्ण जगाला हेवा वाटावा असेच आहे. तर ज्या पद्धतीने संपूर्ण जगामध्ये सर्वात सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत जगामध्ये सर्वात उत्तम लोकशाही म्हणून या भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत.

तर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघात सर्व मतभेद बाजूला ठेवून विकास कामे केली जात असल्याचे सांगत ५० लाखाचा निधी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर, सुशोभीकरणासाठी आमदार फंडातून देत असल्याचे सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनीता कांबळे, माजी आमदार सुरेश लाड, जगदीश गायकवाड, दत्ताजी मसुरकर, धर्मानंद गायकवाड नरेंद्र गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.