Press "Enter" to skip to content

नोव्होझाईम्स व अनार्डे फाउंडेशन च्या माध्यमातून विविध विकासकामांचे लोकार्पण

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

नोव्होझाईम्स व अनार्डे फाउंडेशन यांच्या माध्यमातून वाशिवली ठाकूरवाडी येथे विविध विकास कामे करण्यात आल्यामुळे नुकताच या झालेल्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणते काम केले यांचे विश्लेषण करून सांगितले.

या ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आले यासाठी १.४ कि.मी.उंचीवर हे पाणी पोहचविण्यात आले.या ठिकाणी असलेल्या दोन विहीरीची स्वच्छता करुन नैसर्गिक झरे निर्माण करण्यात आले.त्याच बरोबर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृह बांधण्यात आले होते.त्याच बरोबर खेळण्याची व्यवस्था,महिला वर्गांसाठी बचत गट स्थापन करण्यात आले.येथिल ग्रामस्थांना सातत्याने रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी फळ झाडे देण्यात आली होती. येथिल ग्रामस्थांना विविध प्रशिक्षण देण्यात आले.अदि विकास कामे हस्तांतरित करण्यात आली.

यावेळी नोव्होझाईम्स कंपनीचे विभागीय अध्यक्ष मोहन सर,प्लांट व्यवस्थापक संजय सुर,अनार्डे फाउंडेशन चे कर्मचारी ,तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक मुंढे, त्याच बरोबर दोन्ही संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थित ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी गडगे तसेच सद्स्य ग्रामस्थ अदि उपस्थित होते.

ग्रामीण भागाचा विकास हाच या संस्थेचा ध्यास हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून, १९७९ मध्ये झालेल्या अनार्डे फाउंडेशन पाणी व्यवस्थापक ,स्वच्छ पाण्याची व्यवस्था,वॉटर फिल्टर, शौचालय उभारणी,तलाव विहीरी स्वच्छता,चेकडॅम बांधणे,बचत गट उभारणी,स्वयंरोजगारसाठी प्रशिक्षण, शैक्षणिक उपक्रम,यासारख्या विविध प्रकल्पांमार्फत गुजरात महाराष्ट्र,अनेक गावामध्ये ,काम सुरु आहे.ठाकूरवाडी व साईनगरमध्ये केलेल्या कामाबरोबर ६ गावामध्ये या सारखे उपक्रम सुरु आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.