राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले सामान अंगणवाडी सेविकांना दिल्याचा खळबळजनक आरोप
सिटी बेल | अलिबाग |अमूलकुमार जैन |
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले सामान अंगणवाडी सेविकांना दिल्याचा खळबळजनक आरोप शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी केला आहे. यावेळी आज पत्रकार परिषद घेत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावळे रमेश मोरे यांनी घेतली.
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने माणगांव तालुक्यातील ३३५ अंगणवाड्यांना लागणारे साहित्य वाटपाचा कार्यक्रम शनिवार दि.०२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी माणगांव कुणबी भवन येथे रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडला होता. यावेळी हा प्रकार झाल्याचे रमेश मोरे यांनी सांगितले.








Be First to Comment