सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करन गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रोशन पवार रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला स्वप्नील घरत संपर्कप्रमुख रायगड जिल्हा, राजेश रसाळ संघटक रायगड जिल्हा,शैलेश कोंडसकर प्रमुख वक्ते रायगड जिल्हा,जितेंद्र ठाकूर
पेण तालुका अध्यक्ष अभिजित मोकल ,उरण तालुका अध्यक्ष,सुरेश जाधव खालापूर तालुका अध्यक्ष,दिलीप साळवी प्रमुख सल्लागार पेण तालुका, दीपक संसारे पेण शहर प्रमुख,दिपाली ठाकूर व राजश्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भानूदास जांभळे यांची रसायनी विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.रसायनी विभाग अध्यक्ष पदी भानूदास जांभळे यांची निवड झाल्याने या परिसरातील स्थानिकांना रोजगार, महिला बचत गट सक्षमीकरण, युवांसाठी क्रिकेट, व्यावसायिकांसाठी नविन व्यवसायासाठी लवकरच मार्गदर्शन शिबीर संघटनेच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष भानूदास जांभळे यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले. भानूदास जांभळे यांची छावा संघटनेच्या रसायनी विभाग अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment