Press "Enter" to skip to content

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : योजनेचे अध्यक्ष नरेंद्रशेठ व सचिव दिलीपभाई टकेही संतप्त

नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ना. आदितीताई तटकरेंचे अधिकाऱ्यांना ३१ डिसेंबर पर्यंतचे अल्टिमेटम

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

जिल्ह्यात गावोगावीच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या असतांना नागोठण्यावरील प्रेमाखातर खा. तटकरे साहेबांनी त्यावेळी विशेष बाब म्हणून मंजूर केलेल्या कोट्यावधींच्या योजनेचे औपचारिक उद्घाटन १० वर्षांच्या कालावधी नंतरही झाले नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आत्तापर्यंत या योजनेचे पाणी नागरिकांना घरोघरी पोचायला पाहिजे होते मात्र ततसे झालेले नाही. त्यामुळे आता बस्स झाले… उर्वरित कामांचा स्वतंत्र आराखडा तयार करून पाणीपुरवठा समितीला विश्वासात घेऊन योजनेचे काम ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत पूर्ण करा, नाहीतर तटकरे साहेबांनी यामध्ये पुन्हा लक्ष घातले तर काय होईल याची कल्पना करा अशाप्रकारे कडक शब्दांत तंबी देत रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरीत अल्टीमेटम दिले आहे. याचवेळी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन व सचिव दिलीपभाई टके यांनीही या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कार्यकर्ते व नागरिकांनीही अधिकारी व ठेकेदारावर तीव्र क्रोध व्यक्त केला.

नागोठण्यातील लोकांच्या जिव्हाळ्याच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे सद्य स्थिती व योजना लवकरात लवकर कार्यन्वित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांबरोबर एक बैठकीचे आयोजन येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ना. आदितीताई तटकरे यांच्यासह पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव दिलीपभाई टके, राष्ट्वादीचे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, हरिषशेठ काळे, रियाज अधिकारी, कृष्णा धामणे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, लियाकतशेठ कडवेकर, प्रकाश जैन, अनिल काळे, हिराजी शिंदे, नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, सचिन कळसकर, दिपेंद्र आवाद, विनय गोळे, सुनिल लाड, सुनील सुटे, ग्रा.पं. सदस्य अखलाक पानसरे, अतुल काळे, सचिन कळसकर, पप्पूशेठ अधिकारी, सुनिल लाड, दिनेश घाग, गुड्डु मोदी , श्रीपाल जैन, असगर मुल्ला, जाहुरुद्दीन सय्यद, रोहिदास हातनोलकर, रविंद्र वाजे, अक्षय नागोठणेकर, प्रकाश मोरे, शहर युवक अध्यक्ष कुणाल तेरडे, पप्पूशेठ जैन, मंगेश तेरडे, मनोज टके, चेतन टके,प्रमोद जांबेकर, प्रथमेश काळे, ऍड. श्रीकांत रावकर, रोशन पारंगे, विजय पारंगे, धृव सोष्टे, अमित जांबेकर, श्याम पाटील, जगदीश दिवेकर, उमेर सांगडे, महेंद्र कदम, महिला आघाडीच्या अमिता शिंदे, ता. उपाध्यक्षा रिचा धात्रक, नंदाताई गायकवाड, राजश्री टके, निष्ठा विचारे, विभाग अध्यक्षा स्नेहल काळे, शहर अध्यक्षा सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, पळस सरपंच परिक्षा घासे, रेश्मा जोशी, योजनेचे ठेकेदार प्रकाश देशमुख, म.जि.प्रा.चे शाखा अभियंता जे.ए. कुलकर्णी, उप अभियंता इ. डी. कोठेकर, रोहा तहसीलदार कविता जाधव -माने, नागोठणे पोनि नारनवर आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, संपूर्ण लाईन व योजनेची लवकरात लवकर पुन्हा पाहणी करा, फिल्टर प्लँट, साठवण टाक्या, पंप हाऊस, अपूर्ण असलेल्या जलवाहिन्या आदी सर्व कामे पाणीपुरवठा समितीला विश्वासात घेऊन लवकरात लवकर पूर्ण कारा. ३ महिन्यांच्या आत या योजनेचे काम पूर्ण करून योजना कार्यान्वित करा. अधिकारी बदलले की, ठेकेदारांना निमित्त मिळते. त्यामुळे योजना पूर्ण होईपर्यंत कुणीही आपली बदली करू नका अन्यथा ठेकेदारासह अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल असा इशाराही यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी दिला.

योजनेचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी सांगितले की, योजनेची आत्तापर्यंत आलेली सर्व रक्कम शासनाकडून थेट ठेकेदाराला मिळाली आहे. योजनेसाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करूनही योजना कार्यान्वित झाली नसल्याने लोकांना पाण्यापासून वंचित ठेऊ नका त्यासाठी पंचायतीनेही आवश्यक ते सहकार्य करावे नाहीतर तटकरे साहेबांना काय सांगायचे ते आम्हाला सांगावे लागेल असे स्पष्ट केले. योजनेचे सचिव दिलीपभाई टके यांनीही कडक शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले की, तुम्ही येथे येऊन जर परस्पर काही गोष्टी करत असाल तर त्या यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत. अन्यथा या योजनेत आत्तापर्यंत कुणी-कुणी व कशाप्रकारे खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यांना उघडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला.

या बैठकीत बोलतांना मध्यंतरी प्रायोगिक तत्वावर स्टँड पोस्टद्वारे सुरु केलेल्या या योजनेचे पाणी फिल्टर नव्हतेच असे स्पष्ट करतांनाच सतीच्या माळावरील साठवण टाकीच्या मोडकळीस आलेल्या पायऱ्या, महामार्गापलीकडे न गेलेली जलवाहिनी या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. या बैठकीत विलास चौलकर, बाळासाहेब टके, असगर मुल्ला, प्रकाश मोरे, विनय गोळे, ध्रुव सोष्टे आदींनी सहभाग घेतला. ही योजना दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी अधिकारी व ठेकेदारांनी ना. आदितीताई तटकरे यांना दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.