सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळील बाळसई बचत गटाच्या इच्छापूर्ती ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी श्री.बेलजाई महिला बचत गटाच्या सौ.प्रिया हरेश ठमके यांची निवड करण्यात आली. बाळसई येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात इच्छापूर्ती ग्रामसंघाच्या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी विविध पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. उर्वरित पदाधिकाऱ्यांत उपाध्यक्षा संजना संतोष भोसले, खजिनदार मोनाली मयुर रेवाले तर लेखनिक म्हणून गौरी कोकाटे यांची निवड करण्यात आली.
सध्याच्या परिस्थितीत बचत गटांच्या माध्यमातून महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन आपल्या संसाराची घडी व्यवस्थित बसविण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. चुल आणि मुल येवढ्यावरच न थांबता बचत गटांच्या माध्यमातून अनेक व्यवसाय व उद्योगांमधुन चांगल्या पद्धतीत उत्पन्न मिळवत आहेत. याचाच एक भाग म्हणून बाळसई येथे बचत गटांमार्फंत इच्छापूर्ती ग्रामसंघाचे काम सुरू आहे.
या बैठकीस रोहा येथील बचत गटाच्या प्रमुख नेहा पाटील यांनी ग्रामसंघाचे खाते कशा पद्धतीने उघडायचे , त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे व ग्रामसंघ कशा पद्धतीने चालवायचा याबद्दल बाळसई गावातील बचत गटातील सर्व सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ऐनघर ग्रामपंचायत सदस्य किशोर नावले, सदस्या अर्चना भोसले, इच्छापूर्ती ग्रामसंघाच्या बचत गटाच्या प्रमुख नेहा पाटील , सी.आर.पी दिपाली गोळे, बॅंक सखी मनिषा जांबेकर, ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रिया ठमके तसेच बाळसई गावातील सर्व बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.








Be First to Comment