Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन येथील दांडगुरी गावात शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारे वाटप

सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे |

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ( सुधारीत नमुन्यातील डिजिटल स्वाक्षांकित गाव नमुना ७ / १२ चे मोफत वाटप कार्यक्रम ) महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्त साधून राज्यभर मोफत डिजिटल सातबारा वाटप कार्यक्रम केला आहे.

श्रीवर्धन येथील दांडगुरी गावात शेतकरी बांधवांना मोफत डिजिटल सातबारे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .ग्रुप ग्राम पंचायत दांडगुरी येथे संरपंच गजानन पाटील , तलाठी देवकांत तात्या ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेलार , श्रीपाल कवाडे ,पोलीसपाटील गायत्री शेलार, दिलीप खेडेकर ,शेतकरी आत्माराम सावंत, शंकर करंबे, धोंडू पवार , सुधाकर शेलार , वसंत कदम ,अशोक सावंत व मान्यवर सदस्य उपस्थितीत होते. महसूल विभागाच्या संबंधित ऑनलाईन सुविधांची माहिती , ई – पीक पाणी यांची माहिती देण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.