Press "Enter" to skip to content

उरण नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकुर |

उरण नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत आगळा वेगळा वृक्षारोपण कार्यक्रम रहाळकर मैदान बोरी येथे पार पडला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते उरण नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबद्दल प्रशस्ती पत्रक देवून गौरवण्यात आले याच वेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण केले.

सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी झाड दत्तक घेवून त्याची वृक्षात रुपातर करण्याचा संकल्प केला त्या रोपट्याला त्यांचे नाव देण्यात आले व त्याच प्रमाणे सदर रोपट्याचे जिओ लोकेशन करून त्याचा Q-R कोड वेबसाईट वर अपडेट होईल जेणे करून त्या झाडाची सद्य स्तिथी पाहता येईल.

या उपक्रममुळे रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याचा दर वाढेल असे मत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी व्यक्त केले .निवळ रोपटी लावून कार्यक्रम पार ना पडता प्रत्यक्ष त्याची काळजी घेण्यासाठी झाड दत्तक घेणे गरजेचे आहे असे मत संतोष माळी यांनी व्यक्त केले .

सदर कार्यक्रमात नगराध्यक्षा सायली म्हात्रे,उपनगराध्यक्ष जयविन कोळी. उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी,नगरसेवक व तालुका प्रमुख रवी भोईर, नगरसेवक कौशिक शहा, महिला बालकल्याण सभापती स्नेहल कासारे ,पाणीपुरवठा सभापती राजू ठाकूर ,आरोग्य सभापती. यास्मिन ग्यास ,ग्रांडवेल नॉर्थन चे व्यवस्थापक अधिकारी इंद्रभान सिंग ,मनोज म्हात्रे ,श्री देठेकर,उरण मेडीकॅल वेल्फेर असोसिएशन चे Dr. सुरेश पाटील, Dr. सत्या ठाकरे ,Dr. विकास मोरे,Dr. घनश्याम पाटील, Dr. संजीव पाटील , तेरापंथ युवक परिषद.चे नयन डांगी,नरेंद्र जैन प्रीतम सांखला
उरण व्यापारी असोशिएशन चे हस्तीमल मेहता,अजित भिंडे ,हितेश शाह, उरण केमिस्ट असोशिएशन चे गिरीश परीहारीया ,नेहरू युवा केंद्र.चे सदस्य आकाश म्हात्रे ,एन.आय. हाय स्कूल चे प्रिन्सिपल कोठावडे सर बचत गट प्रतिनिधी अभया म्हात्रे ,पत्रकार सुनिल ठाकूर ,आरोग्य विभागाचे अधिकारी हरेश तेजी व त्यांचे सर्व सहकारी दीपक दळी ,योगेश म्हात्रे ,व इतर नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थीत राहून वृक्षारोपण केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.