सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा व लायन माधव आग्री यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जय भवानी मित्र मंडळ ग्रामस्थ व महिला मंडळ गावठाण यांच्या सहकार्यातून रोहा तालुक्यातील गावठाण येथे या परिसरातील इयत्ता दहावी, बारावी, व पदविधर या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले आयोजित उपक्रमाला विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा चे अध्यक्ष डॉ सागर सानप ,ऍड हर्षद साळवी,पुढारी पेपरचे उपसंपादक महादेव सरसंबे रोहा लायन्सक्लबचे खजिनदार डॉ श्याम लोखंडे,सचिव रवींद्र लोखंडे,बोर्ड ऑफ डायरेक्टर लायन अनिल महाडिक अलंकार खांडेकर, नंदकुमार कळमकर, महेश तुपकर,विश्वास निकम , दत्ता सानप ,प्रभाकर दळवी,सागर सानप हभप नरेश दळवी
यांच्यासह मान्यवर उपस्थित तसेच आदी विद्यार्थी व ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी या परिसरातील सुमारे तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वरूपातील वस्तूंचे वाटप केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर ऍड हर्षद साळवी व पुढारी पेपरचे उप संपादक महादेव सरसंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की विद्यार्थ्यांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण स्वतः काय तरी केलं पाहिजे तसेच विविध स्पर्धा परीक्षा देऊन कोणी तरी बनायचं आहे हे ध्येय मनाशी बाळगा आपलं भवितव्य आपणच ठरवलं पाहिजे शिकलात तर ठिकाल हे ब्रीद वाक्य सांगता शिक्षण महत्वाचे आहे असे उत्तम मार्गदर्शन केले,तसेच लायन्सक्लब चे अध्यक्ष डॉ सागर सानप,लायन डॉ श्याम लोखंडे,रवींद्र लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन राष्ट्रगीताने तसेच महाड येथील दरडग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण करून ह भ प नरेश महाराज दळवी यांच्या समधुर आवाजातील स्वागत गीताने करण्यात आली तद्नंतर मान्यवरांचे स्वागत विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रास्तविक डॉ श्याम लोखंडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपस्थित मान्यवरांचे दत्ता सानप यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
प्रसंगी या कार्यक्रमासाठी सागर सानप,प्रभाकर दळवी,प्रथमेश भोकटे,शैलेश कदम,गणेश कदम,अमोल सानप,शरद कदम,ओमकार कदम,सह मंडळातील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले .








Be First to Comment