सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा व लायन माधव आग्री यांच्या संयुक्त विद्यमाने खांब परिसरातील खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा चिल्हे येथे विद्यार्थ्यांना बसण्याचे बेंच वाटप करण्यात आले.
२ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान इंटरनॅशनल लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट ३२३१ A २रिजन ३झोन २ सन २०२१/२२ लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चा सेवा सप्ताह दरम्यान विविध उपक्रम राबवले जात असून 4 ऑक्टोबर रोजी शालेय बेंच वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ रोहा चे झोन चेअरमन रवींद्र घरत,अध्यक्ष एम जे एफ नुरुद्दीन रोहावाला,सचिव जयदीप पवार,कोलाड रोहा लायन्सक्लब चे सचिव लायन रवींद्र घरत खजिनदार डॉ श्याम लोखंडे बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक,महेश तुपकर, लायन सौ पूजा लोखंडे तसेच ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे ,राजिप चिल्हे शाळेचे मुख्याध्यापक गिरे, सहा शिक्षक शरद पवार ,तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत उप सरपंच सौ मानसी लोखंडे ,खांब ग्राम पंचायत सदस्या सौ चितळकर,सेवा निवृत्त शिक्षक गोविंद वाटवे, ऐनवहाल ग्राम पंचायत माजी सरपंच सौ सुचिता गोळे,सह मान्यवर आदी विद्यार्थी व पालक व शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल साठी पंधरा व राजिप शाळा चिल्हे येथे दहा असे एकूण पंचिविस शालेय बेंच चे वाटप यावेळी करण्यात आले.








Be First to Comment