सिटी बेल | रोहा | समिर बामुगडे |
रोहा पंचायत समिती कै दत्ताजीराव तटकरे सभागृह मध्ये झालेल्या नविन रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
डी. डी. चिपळुणकर यांच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, संघर्ष केल्या शिवाय परिपुर्ण ग्रामसेवक होता येत नाही. आपल्या कार्य क्षेञाचा अभ्यास करा व नविन आलेले आत्मसात करा. सतत कार्यरत राहा आणि लेखासंहिता प्रमाणे ग्रामपंचायत दप्तर लावा. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बराच बदल झालेला आहे त्याचा अभ्यास करा. तसेच प्रशासनाचा अभ्यास असणे आवश्यक आहे तसेच ग्रामसेवकाची पुढील वाटचाल लेखासंहितेवर अवलंबुन असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहा तालुका नुतन पदाधिकारी पुढील प्रमाणे… आर पी पाटील – उपाअध्यक्ष, डी एस सावंत – कार्याअध्यक्ष, अमोल ताबडे – सचिव, जि आर शिद – खजिनदार, अशोक गुट्टे – सह सचिव, अप्पासाहेब काबळे – कायदे विषयक सल्लागार, रेश्मा पाटील – सचिव, रेश्मा वेटकोळी – उपाध्यक्ष, पाबरेकर – सल्लागार कायदेविषयक. या नुतन पदाअधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment