Press "Enter" to skip to content

नंदकुमार मरवडे यांची लक्षवेधी कामगिरी

लाँकडाऊनमध्ये प्राप्त केली ५०० हून अधिक सन्मानपत्र

सिटी बेल | कोलाड | कल्पेश पवार |

रोहे तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे येथे शिक्षकी सेवेत कार्यरत असलेल्या नंदकुमार मरवडे यांनी
कोरोना काळात लाँकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा चांगला सदुपयोग विविध आँनलाईन स्पर्धा,उपक्रम व कार्यक्रमात सहभागी होऊन लक्षवेधी कामगिरी करीत ५०० हून अधिक सन्मानपत्र प्राप्त केले आहेत.

गतवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी लागू करण्यात आलेल्या लाँकडाऊनमध्ये सर्वच व्यवहारांवर निर्बंध लागू करण्यात आले होते. अशा परिस्थितीत सर्वच व्यवहार ठप्प ठेवण्यात आले होते. तर केवल आँनलाईन व्यवहार,कार्यक्रम व उपक्रम तेवढे सुरू होते.अशा परिस्थितीमध्ये नंदकुमार मरवडे यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध माहितीपर समुह,साहित्यिक ग्रुप यामध्ये सहभागी होऊन व त्यांच्या मार्फत राबविण्यात आलेले विविध कार्यक्रम, उपक्रम व.स्पर्धेत सहभागी होऊन केवल दीड वर्षाच्या कालावधीत तब्बल ५२१ सन्मानपत्र प्राप्त केले आहेत.

यामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम क्र.ते उत्तेजनार्थ व लक्षवेधी क्र.संपादित केले आहेत. तर पुणे,नगर,कोल्हापूर, ठाणे,मुंबई,पालघर,वर्धा, नांदेड, यवतमाळ ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद आदी आपल्या महाराष्ट्र राज्यातील विविध साहित्यिक समूहात लेख लेखन, निबंध स्पर्धा, चारोळी लेखन, काव्यलेखन आदी साहित्य प्रकारासह विविध शालेय उपक्रम व स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी हे सुयश संपादित केले आहे.

तर देश पातळीवर राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार,उत्तराखंड आदी राज्यातील विविध राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाल्याने त्याचप्रमाणे आँस्ट्रेलिया,नेपाळ, बांगलादेश, जपान आदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्पर्धेत सहभागी होऊन सन्मानपत्र मिळविले आहेत.

त्यांच्या या लक्षवेधी कामगिरीबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.