माजी आमदार डी.एन.चौलकर यांचा पत्रकार परिषदेत सवाल
सिटी बेल| अलिबाग | अमूलकुमार जैन |
महाराष्ट्रात अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे काढत आहेत.योग्य कागदपत्र हातात लागल्यावर ते मीडिया समोर येतात व भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करतात. महाराष्ट्रात बीजेपी सत्ता नाही म्हणून येथे ईडी चा ससेमिरा तर भ्रष्टाचार काढण्यासाठी सोमय्या हे गणित जुळले आहे.किरीट सोमय्या यांनी भ्रष्ष्टचार प्रकरणे काढल्याची फक्त माहिती देतात परंतु तद्नंतर त्याचे पुढे काय करतात हे मात्र सांगत नाहीत.ज्यावेळी त्यांनी एखादे प्रकरण काढले त्याची प्रसिद्धी मिळवली त्याप्रमाणे त्या प्रकरणाचे पुढे काय झाले चौकशीत काय निघाले भ्रष्टाचार शाबीत झाला का या गोष्ट्टी सुद्धा मीडियाला सांगितल्या पाहिजेत हि त्याची नतिक जबाबदारी आहे.मागे एक नेत्याला दिवाळीत अटक होणार त्याची चौकशी होऊन तो जेल मध्ये जाणार असे सांगत होते परंतु कालांतराने हा प्रश्न उत्तर न देताच संपुष्ठात आला होता.किरीट सोमय्या याना भ्रष्टाचाराची प्रकरणे काढण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केले आहे काय याचे अधीकृत रित्या भाजपने उत्तर द्यावे अशी मागणी माजी आमदार डी.ऐन.चौलकर यांनी पत्रकार परिषदेमधून केली आहे.
काँग्रेस आय पक्षाचे मालाड मुंबई येथून निवडून आलेले माजी आमदार डी.ऐन.चौलकर यांनी त्यांच्या निवास्थानी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले कि, महाराष्ट्रात कोणताही नेता प्रबळ होत असेल तर त्याच्यावर इ डी ची चौकशी लावली जाते.आजव बीजेपी कडे अब्जो रुपयांचा फंड जमा आहे.बीजेपी मध्ये कोणी भ्रष्टाचार करीत नाही का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.किरीट सोमय्या यांनी मागील पाच वर्षात किती भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली त्या प्रकरमधून निष्कर्ष काय निघाला याची माहिती सुद्धा जनतेला द्यावी अशी जोरदार मागणी यावेळी चौलकर यांनी केली आहे.भ्रष्टाचाराची प्रकरणे काढल्यावर आठ ते दहा दिवस मीडिया समोर येतात मग मात्र शांत का बसतात याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे अशी परखड प्रतिक्रिया सुद्धा यावेळी त्यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व ओ बी सी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने महारष्ट्राला मुक्त हस्ते मदत केली पाहिजे.हे प्रश्न न सुटल्याने अस्थिरता निर्माण होऊन संघर्ष सतत चालू रहाणार आहे.यासाठी केंद्राने राज्याला मदत करणे खूप आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
कोकण रेल्वे चे खाजगीकरण कशा साठी केंद्राकडे रेल्वे राहिली तर काय बिघडणार आहे.ज्या आदरणीय मधू दंडवते यांनी कोकणात रेल्वे आणली तिचे खाजगीकरण करून दुसऱ्याला देऊन टाकणे हे कितपत योग्य आहे. रेल्वे च्या खाजगीकरणावर कोकणातील जनता आक्रमक होणे खूप आवश्यक असल्याचे मत चौलकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रंतप्रधान मोदी साहेबानी परकीय देशातील उद्योग धंदे आणताना प्रकर्षाने महाराष्ट्राचा विचार करावा जिथे बीजेपीची सत्ता आहे तिथे उद्योग धंदे नेऊ नका राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक झाली तर बेकारी सुद्धा हटणार आहे हे पक्के ध्यानात ठेवावे असे स्पष्ट प्रतिपदान यावेळी चौलकर यांनी केले आहे.काँग्रेस पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी यांच्या कडे देण्यात यावे याला कोणीही विरोध करू नये यासाठी सर्वांचे एकमत होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.








Be First to Comment