सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या व चित्रकला प्रदर्शन भरवून आपल्यातील कलाकौशल्यांचे सादरीकरण केले.
कोरोना महामारीमुळे सर्वच बाबतीत बंधनं आली असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा या पालक व स्थानिक प्रशासनाच्या संमतीनुसार व शासकीय कोरोना नियमानुसार यापूर्वीच सुरू करण्यात आल्या आहेत. तर विद्यार्थी श्रमिक विद्यालय चिल्हे येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्गानी वर्गाच्या सुप्त कलागुणांना वाल मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी चित्रकला प्रदर्शन व विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले.विद्यार्थी वर्गानेही स्वत: चित्र रेखाटून व मिळेल ती भाजी आणून प्रदर्शनात मांडून सहभाग नोंदविला.
या प्रदर्शनाचे माध्यमातून शाकाहार पुर्ण आहार किंवा सकस आहार तसेच शुद्ध आहार असल्याचे मनोगत व्यक्त करताना शिक्षकांनी सांगितले. तर कला ही कोणतीही असो तिला लहानपणापासून वाव दिला तर त्यामध्येही आपले वेगळे करिअर घडू शकते असेही सांगण्यात आले.या प्रदर्शनाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दीपक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.








Be First to Comment