Press "Enter" to skip to content

खारगाव ग्रा.पं.मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहा तालुक्यातील ग्रूप ग्राम पंचायत खारगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे दुसरे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
    

२ ऑक्टोंबर रोजी जगाला सत्य व अहिंसेचे संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि “जय जवान जय किसान” चे नारा देणारे भारत रत्न भारताचे  दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत त्यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत त्यांच्या उल्लेखनीय राष्ट्रीय कार्य कर्तव्याची थोडक्यात महती विषद करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
 

याप्रसंगी खारगाव ग्राम पंचायत सरपंच सौ.सलोनी सतेज आपणकर , उपसरपंच नितीन मालुसरे,ग्रा.पं.सदस्य नरेंद्र पाटील,ग्राम विकास अधिकारी दिलीप पाबरेकर,शैलेश खिरीट,अवधूत मातेरे,सुधीर मेहेतर,ग्राम पंचायत कर्मचारी वृंद देवाजी गायकर,रुपेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.