सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहा तालुक्यातील नंवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे दुसरे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी विविध कार्यक्रमाने साजरी
करण्यात आली.
२ ऑक्टोंबर रोजी जगाला सत्य व अहिंसेचे संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि “जय जवान जय किसान” चे नारा देणारे भारत रत्न भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत त्यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत त्यांच्या उल्लेखनीय राष्ट्रीय कार्य कर्तव्याची थोडक्यात महती विषद करून विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच यावेळी विद्यालयातील गरजू ल होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक दीपक जगताप, सहा.शिक्षक नरेंद्र माळी, आर.के.म्हात्रे, शिवनाथ दराडे,आमोघसिद्ध सुरवसे,
संजय आंधळे,सुनील थिटे,महेंद्र जवरत,पांडुरंग शिद,अमित डाके, अनुराधा मोरे,ज्योत्स्ना सबरदंडे,प्रविण मरवडे, रेश्मा शिंदे, रामदास नवघरे, चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.








Be First to Comment