सिटी बेल | खांब-रोहा | नंदकुमार मरवडे |
मराठा महासंघाच्या 1994 साली सभेत उपस्थीत राहिल्याने मला मराठा समाजात काम करण्याची संधी मिळाली. राज्य व देशाच्या सभांमध्ये मराठा महासंघाने त्यांचा प्रश्नांची उकल केली. या सभेत सर्वपक्षीय नेते उपस्थीत होते.
या सभेत मराठा समाजाने राजकीय आरक्षण मागीतले नाही. तर विद्यार्थ्यांना शिक्षण व नोक-यांमध्ये आरक्षण मागितले तेही रास्त आहे. असे विधान मराठा महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व्ही.टी.देशमुख यांनी केले. यापुढे ते असेही म्हणाले कि, मराठा समाजाला एकत्रीत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही संघटना मजबूत केली. अखिल भारतीय मराठा महासंघ हा राज्य व देश पातळीवर सामाजिक प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ आहे. शनिवारी 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रोह्यातील शिवतिर्थ निवास येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा अंबरे, शेणवई ग्रामपंचायत सरपंच डॉ.प्रगती देशमुख, मराठा समाज माजी तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे, सुनिल देशमुख, रमेश विचारे, विक्रांत देशमुख, लिलाधर देशमुख, राजेंद्र भोसले व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अखिल भारतीय मराठा सामाजाची नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती बैठक आयोजित करण्यात आली होती. यात रायगड जिल्हा उपाध्यक्ष रमेश लक्ष्मण विचारे, रोहा तालुका अध्यक्ष लिलाधर रामचंद्र देशमुख, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय भोसले, रोहा तालुका युवक अध्यक्ष विक्रांत हेमंत देशमुख, यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. या सभेत नवनिर्वाचित पदाधिका-यानी आपले मनोगत व्यक्त केले व आमच्याकडून रायगड जिल्हा मराठा समाजाची मराठा महासंघाची संघटना मजबूत होईल असे आश्वासन देण्यात आले.








Be First to Comment