येथिल गोखले महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी थोर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या वेळी एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर लहारे व प्रा वाल्मिक जोंधळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा पंकज गमे, प्रा. सौ. दिपाली पाठराबे, शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रशांत गुरव, श्री कमलेश दसरे श्री अरूण भगत, ग्रंथपाल प्रा. सागर कुंभार तसेच एन एस एस स्वयंसेवक सहभागी झाले होते, या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस व्ही जोशी यांचें मार्गदर्शन लाभले होते, कोरोनाचे सर्व नियम पाळुन हा कार्यक्रम घेण्यात आला.








Be First to Comment