Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये गृहोपयोगी उत्पादनांचे प्रदर्शन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत शहरातील उद्योजिका स्वाती वैद्य आणि कीर्ती जोशी संचालित ” मिळून साऱ्याजणी ” या महिला उद्योजिका समूहातर्फे गृहोपयोगी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

ब्राह्मण सभा सभागृहात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रदर्शनात एकूण 13 महिला उद्योजकांनी आपापले स्टॉल मांडले होते. इमिटेशन ज्वेलरी, लहान बाळांचे कपडे, बेडशीट, ड्रेस मटेरिअल, पूजेच्या वस्तू, विविध पर्सेस, घाणीचे खाद्य तेल, क्रोशाच्या वस्तू आणि विविध खाद्यपदार्थ असे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात पाहायला मिळाले. कोविड 19 चे सर्व नियम पाळून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भरवल्या गेलेल्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये खूप उत्साह दिसून आला.

सर्वांची अशीच साथ लाभल्यास भविष्यात अशी अधिकाधिक प्रदर्शने भरवून महिला उद्योजिकांना सक्षम व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.