Press "Enter" to skip to content

अपघात टाळण्यासाठी खोपटे येथे साफसफाई

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचा अभिनव उपक्रम

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरणमध्ये अनेक अपघात होत आहेत व या अपघातात उरण मधील तरुणांचा नाहक बळी जात आहे.अपघाताच्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेले झाडी झूडपे, गवते.या झाडी झूडपामुळे अनेकदा समोरील वाहने दिसत नाही व अचानकपणे अपघात होतो त्यामुळे अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता अपघात होऊ नये यासाठी खोपटा ब्रिज येथे असलेले झूडपे, गवत काढून तो परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने केला.

रविवार दि 3/10/2021 रोजी या परिसरात सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत गवत, झूडपे काढून टाकून साफसफाई करण्यात आले.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, सचिव प्रेम म्हात्रे, खजिनदार सुरज पवार,मार्गदर्शक सल्लागार सुनील वर्तक,समीर पाटील, गणेश म्हात्रे,हेमंत कोळी,नितेश पवार, शुभम ठाकूर,रवी म्हात्रे,कल्पेश कोळी, हेमंत ठाकूर,माधव म्हात्रे,अनिल घरत, सागर घरत,जितेंद्र पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

रविवार हा सुट्टीचा दिवस. या दिवशी प्रत्येक जण फिरायला जातात. मौजमजा करतात पण श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी अपघात होऊ नये म्हणून आपला अमूल्य वेळ देऊन गवत झूडपे तोडून साफसफाई करण्यात घालवीला.व आपला वेळ सत्कारणी लावला.या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अशा प्रकारे प्रत्येक सामाजिक संस्थांनी विविध उपाययोजना केल्यास नक्कीच उरण मधील अपघात कमी होतील असे मत उरण मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.