सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषदेने नगरपरिषद क्षेत्रातील 105 दिव्यांग लाभार्थींना 5 लाख 12 हजार रुपयांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.
नगरपरिषदेच्यावतीने नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थींना आवाहन करण्यात आले होते, सप्टेंबर 2021 अखेर पर्यत 105 लाभार्थीनी नगरपरिषदकडे आपले अर्ज दाखल केले होते. या सर्वांना नगरपरिषद फंडातून लाभ देण्यात आला.

दिव्यांगांना लाभाचे वाटप करण्यासाठी नगरपरिषदेच्या तळमजल्यावरील मोकळ्या जागेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, नगरसेविका विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर,मधुरा चंदन, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, प्रशासकीय अधिकारी उमेश राऊत, दिव्यांग कल्याण निधी लिपिक बापू बहिरम आदी उपस्थित होते.
103 दिव्यांग लाभार्थींना थेट लाभार्थीच्या बँक खात्यात प्रत्येकी 4 हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली, तर दोन लाभार्थींना दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत प्रत्येकी 50 हजार रुपये मोटार सायकल साठी देण्यात आले असा एकूण 5 लाख 12 हजार रुपयांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. दिव्यांगाचे प्रमाण पत्र आणि अटी शर्तीनुसार हे वाटप होत असते

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी दिव्यांग हे वेगळे नसून समाजाचाच भाग आहेत, त्यांना समाजाच्या प्रत्येक प्रवाहात मानाचे स्थान आहे,कोरोना महामारीत त्यांना सहकार्य म्हणून या आधी एक हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते , आणि आता दिव्यांग निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी 4 हजार रक्कम दिव्यांगासाठी देण्यात येत असून ही रक्कम मोठी नाही मात्र आपली नगरपरिषद क वर्गात असल्याने आपल्याला काही बंधन आहेत .. दिव्यांग निधी उपलब्ध होईल तसतसे त्या प्रमाणात योग्य ती मदत केली जाईल .
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लिपिक रविंद्र लाड यांनी केले. याप्रसंगी लाभार्थी, नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होता.







Be First to Comment