सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद |
नागोठणे लेकव्ही हॉटेल जवळ पूर्वी संपूर्ण नागोठणे गावाचा केर कचरा नागोठणे ग्रामपंचायत ट्रॅक्टरद्वारे टाकत असे त्यामुळे दुर्गंधीचा सर्व लोकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यावेळी अनेक वेळा पत्रकारांनी केर कचरा संदर्भात लिखाण करून वृत्त माध्यमांनी बातमी प्रसिद्ध केली होती त्याच प्रसिद्धी बातमीकडे नागोठणे ग्रामपंचायतीने लक्ष केंद्रित करून त्या परिसरात केर कचरा टाकू नये म्हणून बंधन आणले.
नागोठणे ग्रामपंचायतीने केर कचरा टाकण्यासाठी नवीन जागा निवड केली डोंगर भाग वासगाव कडे रस्त्यावरून जात असताना गोलीबार हे खुली जागा डाव्या बाजूला पहाता त्या खुली जागेत संपूर्ण नागोठणे गावाचा केर कचरा टाकण्याची नागोठणे ग्रामपंचायतीने उपाय योजना केली.
केरकचरा तसेच गावामध्ये दुर्गंधी पसरू नये जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देत आहे नागोठणे गाव स्वच्छ व सुंदर गाव अशी मोहीम नागोठणे ग्रामपंचायत सध्या राबवीत असताना नागोठणे येथील मुस्लिम समाज यांचे पवित्र स्थल कब्रस्तान जवळ नारळ पाणी विक्रेते फ्रुट विक्रेते केरकचरा टाकत असल्याने कब्रस्तान मध्ये मुस्लिम बांधव यांना जाताना तसेच त्याच रस्त्यावरून इतर पदचारी जात असताना त्यांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागत आहे तरी नागोठणे ग्रामपंचायतीने या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी जनतेची चर्चा होत आहे.








Be First to Comment