सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
दांड रसायनी रस्त्यावर रसायनी वृंदावन,मोहोपाडा बॅक ऑफ इंडिया,मोहोपाडा प्रवेशद्वार,माणिक प्रबळ,पराडे काॅर्नंर या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना, प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे . कंत्राटदाराने केलेलं नित्कृष्ठ दर्जाचे काम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामूळे अनेक खड्डे महत्त्वाच्या ठिकाणी पडले आहेत.खड्यांमुले या रस्त्यावर अपघातांना आमंत्रण मिळत होते.सदर परिस्थितीबाबत नागरिकांनी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांना सांगताच त्यांनी लोकसहभागातून दांड ते रसायनी या रस्त्यावरील खड्ड्यांत सिमेंट मिक्स खडी टाकून बुजविले आहेत.कायदा व सुव्यवस्थेसह सामाजिक कार्याची आवड असणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांचे नागरिकांनी आभार मानले.

पावसामुळे दांड रसायनी रस्त्यावर खड्डयात पाणी भरपूर प्रमाणात साचत असल्याने दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवताना खड्डे चुकविता वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.यामुले खड्यांत वाहन आदलल्याने तसेच खड्यांतून मार्ग काढताना अनेकांच्या वाहनांना अपघात होऊन काहींना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास झाला आहे.दांड-रसायनी रस्त्यावरील रसायनी वृंदावन फ्लोरा प्रवेशद्वार,जनता विद्यालय वळण, मोहोपाडा थांबा , माणिक प्रबळ,पराडे काॅर्नंर आदी रस्त्यावर भलेमोठ्या व्यासाचे खड्डे पडल्याने गेल्या महिनाभरापासून अनेक अपघात झाले.यात काही दुचाकी वाहनचालकांना गंभीर दुखापत झाली आहे.सदर समस्या अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडल्या परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष राहिल्याने दांड ते रसायनी रस्त्यावरुन वाहनचालकांना प्रवास करताना दिव्यच होवून बसल्याने अनेकांनी याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांना सांगितल्या.
यावेळी सामाजिक कार्यांचीही आवड असणारे रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या प्रयत्नातून सिमेंट काॅक्रीट मिश्रण असलेला माल खड्यांत टाकून खड्डे बुजविल्याने त्यांच्या कार्याचे वाहनचालक, प्रवाशांकडून कौतुक होत आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी रसायनी पोलिस ठाण्याचा चार्ज घेवून एक महिना झाला असतानाच नागरिकांच्या समस्यांकडेही लक्ष घातले आहे.दांड रसायनी रस्त्यावरील खड्डे स्वतः उपस्थित राहून भरुन घेतले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच राकेश खारकर, सदस्य स्वप्निल राऊत उपस्थित होते.रसायनीत सर्व मुख्यठिकाणी जवळपास शंभरपेक्षा जास्त सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी सांगितले.








Be First to Comment