Press "Enter" to skip to content

सत्यभामा गायकर यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहा तालुक्यातील खारगाव ग्रूप ग्राम पंचायत सदस्य मोरेश्वर गायकर यांच्या मातोश्री सत्यभामा आत्माराम गायकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
      

खारगाव येथील रहिवासी तथा ग्राम पंचायत विद्यमान सदस्य मोरेश्वर आत्माराम गायकर यांच्या मातोश्री सत्यभामा आत्माराम गायकर या अत्यंत प्रेमळ मनमिळावू शांत आणि संयमी व सुस्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच  खारी – आरे पंचक्रोशिमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळ हळ व्यक्त होताना दिसत आहे.

याप्रसंगी कुणबी,आगरी – कोळी समाज बांधव तसेच खारगाव ग्रा.पंचायत चे आजी – माजी सरपंच, गाव कमिटी अध्यक्ष, सचिव,सदस्य आदी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींसह त्यांचे आप्तस्वकीय मित्र परिवार व सगेसोयरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.कोरोना विषाणू संसर्गाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या प्रचलित नियमांचे पालन करीत कमीत – कमी नातेवाईकांच्या उपस्थितांमध्ये त्यांचे अंतसंस्कार विधी उरकण्यात आले..
      

त्यांच्या पश्चात दोन मुलगे,तीन मुली,सूना,नातवंडे,पतवांडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुधवार.दि.०६ ऑक्टोंबर  होतील तर अंतिम धार्मिकविधी बारावे शुक्रवार.दि.०८ ऑक्टोंबर रोजी खारगाव येथील निवासस्थानी राहत्या घरी होतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.