Press "Enter" to skip to content

गांधी जयंती निमित्त बोहरा समाजाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार

सिटी बेल| कर्जत | संजय गायकवाड |

बोहरा समाज, प्रोजेक्ट राईज आणि बुरहानी गार्ड्सच्या संयुक्त विद्यमाने कर्जत नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून तर अन्य गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

कर्जत नगरपरिषदेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, दाऊदी बोहरी समाजाचे आमिल शेख मन्सूर यमानी, माजी नगरसेवक झुलकर डाभिया, शब्बीर धरीवाला आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

हुसेन जमली यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तविकात, ‘समाजाप्रती आपले काही देणे लागते व समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत असलेल्यांचे नेहमी ऋणी राहायला हवे. अशी शिकवण देत दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन व त्यांचे अनुयायी समाज कल्याणाची कामे करीत असतात. त्याचाच भाग म्हणून आम्ही या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.’ असे स्पष्ट केले.

त्यानंतर नगरपरिषदेच्या स्वच्छता कामगारांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. आरोग्य विभागाचे निरीक्षक सुदाम म्हसे त्याच बरोबर पत्रकार विजय मांडे, प्रशांत खराडे यांचा तसेच लसीकरण संघर्ष समितीचे ऍड. कैलास मोरे, विनोद पांडे, शिवसेवक गुप्ता, प्रशांत उगले, अजय वर्धावे आदींचा शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी ‘आपण झोपलेले असतो तेंव्हा आरोग्य विभागाचे सफाई कामगार काम करीत असतात. त्यांच्या कामाने खरे तर आमच्या सारख्यांना पुरस्कार व सन्मान मिळतो पण पडद्यामागचे सूत्रधार तेच आहेत. त्यामुळे त्यांचा आज सन्मान होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. आपण दोन – अडीच महिन्यांनंतर दुसऱ्या डोस साठी महा लसीकरण शिबीर आयोजित करणार आहोत. त्यावेळी आपले सहकार्य मोलाचे ठरेल.’ असे स्पष्ट केले.

यावेळी अमूर खारिजिया चे पदाधिकारी फातेमा जमाली या उपस्थित होत्या. यावेळी बुरहानी गार्डचे कॅप्टन मुफद्दल डाभिया, हुसेन जमाली, मुल्ला मुर्तजा, मुस्तान भाई, ताहेर कर्जतवाला, हुझेफा धरिवाला, मुस्तफा भाई, शब्बीर कर्जतवाला, अली भाई, हुसेन वडगाववाला,युसूफ धरिवाला उपस्थित होते. लेडीज विंग कडून डॉ. फातिमा कर्जतवाला, फतेमा जमली, अरवा बेन, समीनाबेन आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन जमाली यांनी केले व आभार प्रदर्शन मुफद्दल डाभिया यांनी केले. यावेळी तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.