सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
तालुका विधि सेवा समिती खालापूर मार्फत भारतभर जागरूकता अभियान व पोहोच कार्यक्रमा अंतर्गत शनिवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिवाणी न्यायालय खालापूर येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
खालापूर न्यायालय ते बस स्थानक अशी रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला खालापूर न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश आर डी वाबळे, दिवानी न्यायाधीश पी एम माने, सह न्यायाधीश श्रीमती एल के सपकाळ, खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी राठोड ,माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, युवा बार असोसिएशन अध्यक्ष एस मानकवळे, अॅडव्होकेट मिलिंद सुरावरकर ,मनोज पाटील, मुनीदास गायकवाड, रमेश पाटील, मिलिंद गायकवाड, श्रीमती शेलार असेच न्यायालयीन व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.







Be First to Comment