Press "Enter" to skip to content

जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त रोटरी क्लबच्या सहकार्याने मोफत तपासणी शिबीर

सिटी बेल | मुंबई |

१ ऑक्टोबर हा जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. जेष्ठांच्या प्रति सन्मान व आदराची भावना वाढीस लागण्यासाठी मोठ्या उत्साहात आपण हा दिन साजरा करतो. जेष्ठ नागरिक दिनानिमित्त झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलतर्फे तसेच इनर व्हील क्लब, घाटकोपरच्या वतीने व रोटरी क्लबच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरात मधुमेह, रक्तदाब, हृदयतपासणी तसेच जेष्ठ हृदयविकार तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ. चेतन शहा म्हणाले, सध्याचा हा काळ जेष्ठांसाठी कोठें काळ आहे. कोरोना महामारीमुळे अनेक बंधने त्यांच्यावर आली आहेत. लस घेतल्यानंतरही अनेक जेष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे.,अशावेळी नियमित आरोग्य तपासणी करणे खूप गरजेचे आहे. घरातल्या तरुण मंडळींनी जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. “

या शिबिरात ४० हुन अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. भारताची आर्थिक परिस्थिती व प्रचंड लोकसंख्या, तशातच नैसर्गिक आपत्ती आणि एकूणच सर्व पातळीवरील सरकारी नियोजन यांचा विचार केल्यास, ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या समस्या खूपच गंभीर झाल्या आहेत. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शारीरिक व इतर अशा अनेक समस्यांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत. उतारवयामध्ये शरीरातील कॅल्शियमची मात्रा कमी झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखी व गुडघेदुखी च्या समस्या वाढीस लागल्याचे या शिबिरात दिसून आले अशी माहिती झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिजिनेस डेव्हलपमेंट प्रमुख श्री आशिष शर्मा यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.