Press "Enter" to skip to content

मनसेच्या पर्यावरण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी राजेश कोळी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनोज हटे व संजय शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरण सेनेच्या उपाध्यक्षपदी उरणमधील राज ठाकरे यांचे समर्थक राजेश कोळी यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल राजेश कोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मनसेचे राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित पर्यावरण कार्यकारणी जाहीर करून त्यांनी नियुक्तीपत्र दिले. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेची राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्षपदी जय शृंगारपुरे, सरचिटणीस निनाद आवळे, कोषाध्यक्ष सत्यजित गायकवाड, उपाध्यक्ष राजेश कोळी,विनीत गुप्ते, चिटणीस श्रीकांत पाथरकर, तुषार वारंग, नितिन समुद्रे, सचिव तेजस पाटील व ईशान चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनसेचे राज ठाकरे समर्थक उरण तालुक्यातील बेलपाडा गावातील राजेश कोळी यांची पर्यावरण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे व अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी माझी पर्यावरण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानून उरण तालुक्यातील पर्यावरण समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष राजेश कोळी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.