सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चा बेस्ट प्रेसिडेंट अवार्डं पुणे येथील हॉटेल मेरी गोल्ड येथे संपन्न झाला.यावेळी डिस्ट्रिक्टच्या वार्षिक अवॉर्ड सेरेमनी सोहळ्यात रसायनी पाताळगंगा रोटरी क्लबला विविध अवार्डंने सन्मानित करण्यात आले.
यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुलकर्णी, पिडीजी विनय कुलकर्णी, सध्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा, डिजी इलेक्ट डॉ अनिल परमार, डिजी नाॉमीनी मंजू फडके,डिस्ट्रिक्टचे अनेक ऑफिसर्स, वेगवेगळ्या ॲव्हेन्युचे डायरेक्टर्स , चेअरमन,अनेक क्लबचे अध्यक्ष,पदाधिकारी,रोटरीयन उपस्थित होते.

दरम्यान सन्मान स्विकारण्यासाठी पाताळगंगा रोटरी क्लबचे रो सुनील कुरूप, रो दिपक चौधरी, रो अंजली पाटील इत्यादी उपस्थित होते. बेस्ट प्रेसिडेंट सहीत “रोटरी ओपन अपाॉरच्यूनीटी ” या रोटरी थीम वर अनेक क्षेत्रांत चांगले काम करत जनतेच्या उपयोगी उपक्रम राबवून रोटरी ची प्रतिमा अधिक समृद्ध केली म्हणून रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट हॉल्गर नॅक यांजकडून क्लबला सायटेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दांडफाटा येथे प्रवासी शेडमध्ये सर्व सोयींयुक्त असे पोलिस मदत केंद्र उभारले म्हणून “पब्लिक इमेज अवॉर्ड” मध्ये तिसरा क्रमांक, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी ग्लोबल ग्रॅंट प्रोजेक्टमध्ये पार्टनर क्लब म्हणून सहभागी झाल्याबद्दल,पंचम प्रोजेक्ट मध्ये गोल्ड अवॉर्ड आणि सर्वीस प्रोजेक्टमध्ये ( नॉन मेडिकल) सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले.
पाताळगंगा रोटरी क्लबला विविध अवॉर्ड , मानसन्मान मिळवून दिल्याबद्दल रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, रोटरॅक्टर्स अनेक सामाजिक कार्यकर्ते, आणि इतरांनी आल्हाद पाटील यांचे आभार मानले.







Be First to Comment